चाणक्यनीती

    29-Jul-2025
Total Views |
 

saint 
वाच्यार्थ: महात्मा लाेकांचे चरित्र खराेखरच किती विलक्षण असते! पाहा ते धनाला तृणवत मानतात आणि त्याच्या भाराने मात्र स्वत:च झुकतात.
 
भावार्थ: येथे महात्मा आणि धन यांचे साहचर्य दाखविले आहे.
 
1. महान पुरुष - थाेर पुरुष यांची राहणी साधी आणि विचारसरणी उच्च असते. धनाला ते साध्य नाही, तर केवळ साधन मानतात. त्यांना सन्मार्गाने कितीही धन प्राप्त झाले, तरी त्यांना अहंकार मुळीच वाटत नाही.ते धनाला तुच्छ समजतात आणि त्यातूनही विराेधाभास हा की, जेवढे वैभव-संपत्ती जास्त तेवढे त्यांचे यांना ओझे वाटते आणि तेवढे ते विनम्र बनतात. फलभाराने वृक्ष वाकताे त्याप्रमाणे.
 
2. सामान्य पुरुष - सामान्यत: व्य्नती धनाला देवी, लक्ष्मी मानून पुजते, महत्त्व देते एवढेच नव्हे तर धनदाैलत, ऐश्वर्य जेवढे जास्त तेवढी ती अहंकारी बनते व निर्धनांना तुच्छ मानून त्यांच्यापासून दूर राहते.