ओशाे - गीता-दर्शन

    25-Jul-2025
Total Views |
 

Osho 
चांगले करण्याचेही अन् वाईट करण्याचेही. इतरांचे वाईट करण्याचे स्वातंत्र्य हे परिणामत: आपले स्वत:चे वाईट करण्याचे स्वातंत्र्य बनून जाते आणि इतरांचे भले करण्याचे स्वातंत्र्य हे स्वत:चे भले करण्याचे स्वातंत्र्य बनून जाते.माणसाला पाहिजे असेल तर ताे नरकातील शेवटच्या दु:खापर्यंत यात्रा करू शकताे आणि ताेच माणूस, अगदी ताेच माणूस, जाे शेवटच्या नरकापर्यंत जाऊ शकताे. ताे इच्छा असेल तर माेक्षाच्या अत्त्युच्य पायरीपर्यंतही यात्रा करू शकताे.या दाेन्ही दिशा माेकळ्या आहेत. म्हणूनच तर माणूस स्वत:चा मित्रही हाेऊ शकताे वा शत्रूही. आपल्यापैकी जे स्वत:चे मित्र असतात असे फारच थाेडेजण असतात.बहुतेक जण स्वत:चे शत्रूच असल्याचे सिद्ध हाेते. कारण, आपण जे काही करताे त्याने दुसरे तिसरे काहीएक न हाेता आपला स्वत:चाच आत्मघात हाेत असताे.
 
अमुक- अमुक माणूस आपला स्वत:चा मित्र आहे वा स्वत:चा शत्रू आहे हे ठरवायचेकसे? एक छाेटीशी व्याख्या निर्माण करता येईल. आपण जर असे काही करीत असू की ज्याने दु:ख फलित हाेते, तर आपण आले मित्र आहाेत असे नाही म्हणू शकत.जी व्य्नती स्वत:करता दु:खबीजे पेरते ती स्वत:चा शत्रू असते. अन् आपण सारे स्वत:साठी दु:खाची बीजे पेरत असताे. पेरलेले बी उगवून पीक यायला बराच वेळ लागताे हे निश्चित. त्यामुळे नंतर आपल्या हे लक्षातही राहत नसते की, ‘अरे! आपण आपल्याच हातांनी पेरलेल्या बीजांचे हे फळ आहे बरं!’ कित्येकदा हा कालावधी इतका माेठा हाेऊन जाताे की, आपण विचार करताे की, ‘अरे! आपण बीज तर अमृताचे लावले हाेते, पण काय दुर्भाग्याची गाेष्ट, फळे मात्र विषाची लागताहेत.’ पण आपण या जगात जे पेरताे त्याशिवाय दुसरी कुठलीही फळे मिळत नसतात.