वाच्यार्थ: कुलमर्यादेसाठी/ प्रतिष्ठेसाठी एका व्य्नतीचा, संपूर्ण गावाच्या कल्याणासाठी एका कुळाचा, देशहितासाठी एका गावाचा आणि आत्माेन्नतीसाठी पृथ्वीचा त्याग करावा.
भावार्थ : प्रसंगानुसार त्यागाचे स्वरूप ठरवावे.
1. कूळ - कूळ किंवा घराणे म्हणजे अनेक आप्तांचा समूह. यात जर एखादी व्य्नती ‘कुळबुडवी’ म्हणजे कुळाची प्रतिष्ठा घालविणारी असेल किंवा तिच्यामुळे कूळनाश संभवणार असेल, तर त्या व्य्नतीचा ‘अवश्य त्याग करावा.’