ओशाे - गीता-दर्शन

    22-Jul-2025
Total Views |
 
 
 

Osho 
 
आपल्या शरीरात आधीच इतके अन्न साचले आहे की महिना दाेन महिने आपण जेवण केले नाही तरी भूक लागणार नाही. पणआपण तर खातच चालला आहात, म्हणून तर मी विचारले की कधी एखाद्या वाघ सिंहाला जेवण झाल्यावरही जेवण करायला उत्सुक पाहिलेत का? त्यांनी म्हटले, ‘नाही, कधीच पाहिले नाही. जेवणानं तर एखादी बकरी जरी जवळ नेली तरी वाघ तिच्याकडे ढुंकूनही पहात नाहीत.’ पण माणसाच्या जवळ मिठाई असेल तर त्याने ती पाहिली नाही, तरी ताे पाहत राहाताे.‘मी इंद्रियाच्या पलीकडे आहे’ हे जाणणारा निसर्गाच्याही पार हाेताे. इंद्रयास्नती शरीराला विकृत व्यवस्था देते. इंद्रियास्नती नसलेल्या व्य्नतीलाही भूक लागेलच, पण ती भूक शुद्ध असेल आणि गरज असेपर्यंतच ती भूक असेल. गरजा खूप कमी आणि वासनाच अनंत आहेत. गरजा फारच मर्यादित असतात. स्वादाला तर कधी शेवटच नसताे.
जेवण तर फार थाेडेसेच पुरेसे असते आणि हे जीवनाच्या सर्वच पैलूंना तितकेच लागू आहे. मग सर्वच बाजूंनी फ्नत शुद्धतम गरजा तेवढ्या शिल्लक राहतील.काही गरजा अशा आहेत की, ज्या व्य्नतीच्या गरजाच नाहीत. उदा. कामवासना. अशांतून ती व्य्नती मु्नत हाेऊन जाईल. जेवण ही आपल्या शरीराची गरज आहे हे निश्चित, पण कामवासना ही आपल्या शरीराची गरज अजिबात नाही. याचा आपण कधी विचार केलात का? कामवासना ही समाजाची गरज आहे. आपण जेवण केले नाहीत, तर आपण मरून जाल.पणआपणास कामवासना राहिली नाही तर संततीनिर्मिती खलास हाेईल.समाजाचा प्रवाह बंद हाेईल. बाकीचे बायाॅलाॅजिकल आहे, जैविक आहे. निसर्गाची जी गरज आहे ती तितकी आपली गरज नाही. आपण मरण्याआधी आपणाकडून कुणाला तरी निसर्ग जन्म देववील. ती निसर्गाची गरज आहे.