तूं गुरु बंधु पिता। तूं आमची इष्ट देवता। तूंचि सदा रक्षिता। आपदीं आमुतें।। (2.59)

    18-Jul-2025
Total Views |
 

saint 
 
अर्जुनाच्या मनातील शंका निवारण करण्याचे कार्य भगवंत विविध प्रकारांनी करीत आहेत. या युद्धाच्या प्रसंगीच अर्जुनाला प्रेमाचा उमाळा कसा आला याबद्दल त्यांना नवल वाटते. या प्रेमामुळे अर्जुनाची या जन्माची कीर्ति जाईल व त्याला परलाेकही मिळणार नाही असे भगवंताना वाटते. अशा अवस्थेत अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणाला, ‘‘देवा, आता या युद्धाचा विचार तुम्हीच करावा. वडील माणसांचा अवमान करून आपण युद्ध करावे असे मला वाटत नाही.मायबापांची खरी म्हणजे पूजा करावी. हे भीष्माचार्य, द्राेणाचार्य खरे म्हणजे माझे विद्यागुरू आहेत. त्यांच्या उपकाराचे ॠण कसे ेडावे? द्राेणाचार्यांनी धनुर्विद्या मला शिकविली. देवा, त्या विद्येने मी त्यांच्यावर प्रहार करावा काय?’’ ‘देवा, द्राेणाचार्यांचे चित्त कधीच क्षुब्ध हाेत नाही.खऱ्या आईच्या प्रेमाची साक्ष म्हणजे द्राेणाचार्यांचे हृदय हाेय. ते करूणेचे उगमस्थान आहे.
 
अशा द्राेणाचार्यांचा घात मी करावा काय? यानंतरचा राज्यभाेग मला नकाे वाटताे. त्यापेक्षा देशांतर करावे, एखाद्या गुहेत जाऊन रहावे असे वाटते.’ अर्जुनाचे हे बाेलणे भगवंतांना पटले नाही. त्यांची उदासीनता पाहून अर्जुनही मनांत शंकित झाला व देवांना म्हणाला, ‘कृष्णा, माझ्या बाेलण्याकडे आपण लक्ष का देत नाही? मला जे वाटते ते मी स्पष्ट सांगितले आहे.आता माझे हिताहित ज्यात आहे ते तुम्हीच जाणा.आता युद्ध करावे की भूमीवरून निघून जावे हेच मला समजेनासे झाले आहे. उचित काय, अनुचित काय; हे स्वजनांवरील प्रेमामुळे माझ्या लक्षात येत नाही. मी अंध असून मला दिसत नाही. माझे चित्त भ्रमिष्ट झाले आहे.सख्या कृष्णा, हित सांगणारा तूंच एक माझा मित्र आहेस.तू आमचा गुरू आहेस. तू आमचा बंधू, पिता, आमची इष्ट देवता; सर्व काही आहेस. तूच आमचे रक्षण कर.’ मी सर्व जगाचा पिता व माता आहे हे भगवंतांनी गीतेत सांगितले आहेच.