आत चेतना कधी म्हातारी हाेत नसते आणि वैज्ञानिकांनी हार्माेन्स् हुडकलेले आहेतच, ते आज ना उद्या इंजेक्शन करून घेतीलच घेतील. मग काय विचारता? एखाद्या म्हाताऱ्याला ते इंजेक्शन दिले की त्याचे चालू वय दहा वर्षांनी घटलेच म्हणून समजा. एक इंजेक्शन दिले की ताे वीस वर्षांनी तरुण झाला. शरीरातील हार्माे न्स् बदलले की, साठीतला माणूस आपण तिशीत आहाेत असे अनुभवेल. पण यावेळी त्याची माेठी पंचाईत हाेईल. शरीर तर साठीतलेच जाणवेल. फक्त हार्माेन्सची व्यवस्था बदलल्याने त्याची स्वत:ची जी ओळख आहे ती पुन्हा बदलेल, शरीर साठीतीलच राहील, ते मागच्या काळात कसे जाऊ शकेल? पण ती व्यक्ती व्यवहार मात्र तिशीतील माणसासारखा करेल.चेतनेला वय वगैरे काही नसते.
जसजसा शरीराच्या वयात फरक पडू लागताे तसतशी चेतनाही स्वत:ला तसेच मानून घेते. चेतना म्हणजे केवळ जाणीव आणि आपण त्या जाणिवेचा दुरुपयाेग करीत आहाेत.जाणिवेच्या जागेपणाच्याद्वारे आपण दाेन कामे करू शकताे. जागेपणाने हवे तर आपण शरीराशी स्वत:ला एक मानू शकताे. हे अज्ञान आहे. जाणीवपूर्वक आपण शरीरापासून भिन्न आहेात असे देखील पाहू शकताेहे ज्ञान आहे. जाे अशा प्रकारे स्वत:ला स्वत:च्या शरीरापासून भिन्न अशा रूपात पाहण्यास समर्थ हाेताे, ताेच इंद्रियांच्या आसक्तीतून मुक्त हाेताे. तर आपली शरीरापासूनची भिन्नतेची जाणीव अधिकाधिक प्रखर कशी हाेत राहील यासाठी उपाय करीत रहा. भूक लागली की माेठ्याने म्हणा, ‘माझ्या शरीराला भूक लागली आहे.’ जेवणाने तृप्त झाल्यावर जाेराने म्हणा, ‘माझे शरीर तृप्त झाले.’