ओशाे - गीता-दर्शन

    11-Jul-2025
Total Views |
 

Osho 
 
कृष्णाने हे जे सूत्र सांगितले आहे, ते वासनाप्रधानांसाठी, सम त्वाच्या घाटाने ताे याेगारूढ हाेऊ शकताे.यदा हि नेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्जते । सर्वसंकल्प संन्यासी याेगारूढस्तदाेच्यते ।।4।। जेव्हा ताे इंद्रियभाेगातही आस्नत राहत नाही आणि कर्मामध्येही आस्नत राहत नाही, तेव्हा त्या सर्व संकल्पांचा त्याग करणाऱ्याला याेगारूढ असे म्हणतात.ज्याची आसक्ती इंद्रियातही नसते अन् कर्मातही नसते, जेव्हा या दाेन्ही आसक्ती उरत नाहीत, तेव्हा त्या क्षणी पुरुषाला याेगारूढ असे म्हणतात. या दाेन गाेष्टी समजून घेणे उपयुक्त हाेईल. ज्याची इंद्रियामध्येही आसक्ती नाही. अन् कर्मामध्येही नाही-हे दाेन्ही संयुक्त आहेत. इंद्रियामध्ये आसक्ती असेल तरच कर्मामध्ये आसक्ती असते.
 
इंद्रियांमध्ये आसक्ती नसेल, तर कर्मामध्ये असक्ती असण्याचे काहीही कारण नाही. म्हणून कृष्ण जे सांगत आहे त्याच्यामागे माेठी वैज्ञानिक प्रक्रिया आहे. ताे आधी म्हणताे ज्याची इंद्रियात आसक्ती नसते... ज्याला इंद्रियात आसक्ती नसते त्याला कर्मात आसक्ती असूच शकत नाही. सर्व कर्मासक्ती ही इंद्रियासक्तीचाच ैलाव असते.जर आपण धन गाेळा करताहात, तर त्यासाठी जे कर्म करावे लागते, त्यामध्ये माेठे आसक्त असावे लागते.ज्याला केवळ कर्म करण्याची आसक्ती आहे, असा माणूस सापडणे अवघड आहे. इंद्रियासाठी धन जे देऊ शकते त्याचे आश्वासन हेच आस्नतीचे कारण आहे.धन इंद्रियांना जे देऊ शकते त्याचे आश्वासन हेच कर्माचे आकर्षण आहे. समजा उद्या असे कळले, की धन आता काही एक खरीदू शकत नाही, तर मग धनातले सगळे आकर्षण खलास हाेऊन जाईल.