जयासि माेक्ष व्हावा। तेणें सद्गुरू करावा ।।2।।

    10-Jul-2025
Total Views |
 
 
 

saint 
माऊंट एव्हरेस्टसारखी शिखरे सर करण्यासाठी भल्याभल्या गिर्याराेहकांनाही जाणकार शेर्पा वाटाड्या म्हणून लागताे आणि विश्वविक्रम करणाऱ्या सचिन तेंडुलकरलाही प्रशिक्षकाची गरज भासते. तेथे ताे शेर्पा किंवा प्रशिक्षक त्यांचे गुरूच हाेत असतात.सद्गुरूवाचून जीवनाचे अंतिम ध्येय, मुक्ती गाठता येणार नाही व मनुष्यजन्म दु:खरूप हाेऊन निष्फळ ठरेल, हे सांगून श्रीसमर्थ म्हणतात की, परम ेश्वरभेटीच्या शाेधाची तळमळ एक सद्गुरूच शांत करू शकताे. आपल्या घरात असलेले गुप्तधन घरात असूनही दिव्य अंजनाशिवाय दिसू शकत नाही.तसेच अंतरातील अंतरात्मा सद्गुरूच्या उपदेशाने प्रकट हाेऊन आयुष्य प्रकाशमान करून टाकताे. श्रीराम, श्रीकृष्ण अशा देवांनीही गुरू केले.
 
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवाे महेश्वर:। गुरु: साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेनम: म्हणजे गुरू हा ब्रह्मा, विष्णू, महेशांचेच नव्हे तर प्रत्यक्ष परब्रह्माचे साकार रूप आहे. म्हणून ज्याला मुक्ती मिळावी, जीवनमृत्यूच्या ेऱ्यातून माेक्ष मिळावा अशी इच्छा असेल त्याने सद्गुरूला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. कारण सद्गुरुवाचून कितीही खटपटी, लटपटी केल्या तरी त्यामुळे कदापिही माेक्षप्राप्ती हाेणार नाही, असे पुन्हापुन्हा सांगून श्रीसमर्थ सद्गुरूची महती ठसवून हा गुरुनिश्चयनाम समास पूर्ण करतात! - प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299