ते म्हणाले, ‘हत्तीच्या, त्यात काय माेठं! मी वाट पाहीन.’ ती म्हणाली, ‘पण ते केव्हा बाहेर येतील ते काही सांगता येत नाही!’ते म्हणाले, ‘बाथरूममध्ये ते अंघाेळ करून-करून किती वेळ करणार?’ ती म्हणाली, ‘अंघाेळ राहिली लांब. ते कित्येकदा तर अंघाेळ न करताच बाहेर पडतात!’ ‘पण मग बाथरूममध्ये करतात तरी काय?’ ‘ते तिथे तेच करतात, जे ते इथे बाहेर असताना करतात. टबमध्ये पडून राहतात अन् विचार करीत राहतात. आंघाेळ तर पूर्णपणे विसरतात.’ सहा तासांनी बहादूर बाहेर आले. माेठ्या आनंदानं बाहेर आले. कुठले तरी गणिताचे काेडे सुटले हाेते.लाेहियांनी विचारले. ‘गणिताचे काेडे आपण न्हाणीत साेडवता की काय?’ त्यांनी उत्तर दिले-एक्स्पांडिंग युनिव्हर्सचा सिद्धांत मी विकसित केला.. ‘की विश्व सतत पसरत आहे.. ते थांबलेले नाही.. ुग्यात हवा भरून ताे माेठा करावा, तसे विश्वही माेठे-माेठे हाेत चालले आहे.
विश्व राेज पसरत चालले आहे.’ या सिद्धांताला समर्थन मिळाले आणि मग ताे प्रकर्षाने सिद्ध झाला.’ तर आईनस्टाईन म्हणाला, ‘हा सिद्धान्त मला कसा सुचला माहीत आहे! मी टबमध्ये बसलाे असताना साबणाचे बुडबुडे बनवताना जेव्हा ते बुडबुडे वाढत गेले, तेव्हा मला ही कल्पना सुचली. आपल्या टबातच बुडबुडे बनवताना, त्यांच्याशी खेळता-खेळता मला कल्पना आली-ती पसरत्या विश्वाची, एक्सपांडिंग युनिव्हर्स असू शकते.’ आपल्याकडे ब्रह्म हा जाे शब्द आहे. त्याचा अर्थच मुळी-एक्स्पान्शन, विस्तार असा आहे. या देशातील ऋषी तर नेहमीच सांगत आले आहेत की विश्व ैलावत आहे, ते थांबलेले नाही. ब्रह्मांड याचा अर्थच ैलावणारे असा हाेताे. जे थांबत नाही, पसरतच जाते.