हा बदल भावनिक रुपात आव्हानात्मक असू शकताे. जेव्हा एखादी व्यक्ती रिटायरमेंटजवळ पाेहाेचते तेव्हा तिच्या व्यवहारात अनेक असामान्य बदल दिसू लागतात. जे नेहमी मानसिक तणावाचे संकेत असतात. वास्तविक जीवन एक चक्र आहे. यात बालपणापासून वृद्धावस्थेपर्यंत आणि नाेकरीच्या सुरुवातीपासून सेवानिवृत्तीपर्यंतचा प्रवास करावयाचा असताे. पण आपण एखाद्या कायमस्वरुपी जबाबदारीतून मुक्त हाेताे एक गाेंधळाची व चिंतेची स्थिती निर्माण हाेते. विशेषकरून तेव्हा जेव्हा आपण या बदलासाठी मानसिक रुपात तयार नसताे. जर याची तयारी आधीपासूनच केली तर जीवनाचा हा नवा अध्याय सुखद व सकारात्मक बनू शकताे.
बदल जे पाहायला मिळतात...
तुलनेची प्रवृत्ती येते : रिटायरमेंटच्या आसपास व्यक्ती नकळत आपल्या सहकर्मचाऱ्यांशी स्वत:ची तुलना करू लागतात.विशेषत: त्या लाेकांशी ज्यांना सेवानिवृत्त हाेण्यास अद्याप काही वर्षे बाकी असतात. ही तुलना निराशा, आत्मसंशय व हीनभावनेला जन्म देते.
जबाबदाऱ्यांची चिंता सतावते : कामापासून दुरावा हाेण्याचा सर्वाेत माेठा मानसिक परिणाम हा हाेताे की, व्यक्तीला वाटू लागते की, ती आता तितकीशी महत्त्वाची राहिलेली नाही.ही भावना त्याला फक्त असुरक्षितच करीत नाही तरएक रिकामपण उत्पन्न करते जे मनाला अस्वस्थ करते.
आर्थिक अनिश्चिततेची भीती असते : सेवानिवृत्तीनंतर कमाईचा नियमित स्राेत मर्यादित वा बंद हाेताे. ज्यामुळे व्यक्ती गडबडते. तिला भीती सतावू लागते की, जर बचत संपली तर भविष्य कसे चालेल. आराेग्यासंबंधित खर्च, कुटुंबाच्या गरजा, महागाई इ. अनेक कारणांमुळे तणाव वाढताे. कधी कधी हीच आर्थिक चिंता काैटुंबिक नात्यातंत कटुता व व्यवहारात चिडचिडही आणू शकते.
एकाकीपणा जाणवू लागताे : कार्यक्षेत्रात राेज लाेकांच्या भेटीगाठी एक सामाजिक गरजही बनते. सेवानिवृत्तीनंतर जेव्हा या दिनचर्येत अचानक बदल हाेताे तेव्हा व्यक्तीला एकाकीपण व सामाजिक दुरावा जाणवू लागताे. कुटुंबातील सदस्य आपापल्या कामांत व्यस्त असतात अशावेळी व्यक्ती स्वत:ला कमी उपयुक्त व महत्त्वहीन जाणवू लागते.