राज्यात गेल्या चार वर्षांत बी.फार्मसी अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांची संख्या भरमसाठ वाढल्याने र्नित जागांचे प्रमाणही वाढले आहे. या पार्श्वभूमीवर आता नव्या महाविद्यालयांना परवानगी देऊ नये, असा प्रस्ताव राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाने उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे पाठवला आहे.फार्मसी काॅलेजांच्या संख्येवर नियंत्रणासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने राज्य सरकारकडे शैक्षणिक वर्ष 2026- 27 मध्ये नवीन महाविद्यालयांना परवानगी देऊ नये, असा प्रस्ताव गेल्या महिन्यात सादर केला आहे. राज्य सरकारकडून मान्यता मिळताच त्याबाबत फार्मसी काैन्सिल ऑफ इंडियाकडे हा प्रस्ताव पाठवून नव्या महाविद्यालयांचे मान्यता प्रस्ताव स्वीकारू नयेत, यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण विभागातून देण्यात आली.
राज्यात 2022 मध्ये बी.फार्मसीची 396 महाविद्यालये हाेती. केवळ चार वर्षांतच त्यांची संख्या 135ने वाढून 531 पर्यंत पाेहाेचली. परिणामी, फार्मसीच्या जागाही वाढल्या. 2022 मध्ये 36888 जागा हाेत्या, त्या यंदा 48,878 वर ेल्या आहेत. 2022 मध्ये 32137 विद्यार्थ्यांनी फार्मसीला प्रवेश घेतला हाेता.यंदा प्रवेशासाठी 48878 जागा उपलब्ध हाेत्या. त्यांपैकी 32951 जागांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले, तर 32.6 ट्नके म्हणजेच 15927 जागा र्नित राहिल्या आहेत.10 महाविद्यालयांत यंदा एकाही विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला नाही, तर 10 पेक्षा कमी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयांची संख्या 37 आहे. 71 महाविद्यालयांत 20 पेक्षा कमी प्रवेश झाले असून, 158 महाविद्यालयांना 50 ट्न्नयांहून कमी विद्यार्थी मिळाले. विद्यार्थी संख्येअभावी महाविद्यालयांना खर्च भागवणे अवघड असून, याचा परिणाम गुणवत्तापूर्ण शिक्षणावर हाेणार आहे.