ओशाे - गीता-दर्शन

    09-Dec-2025
Total Views |
 

Osho 
 
घरातलं खायला मिळतंय.झकासपैकी राहायला मिळतंय.हे सगळं ताे शेपूट हलवून खरेदी करताेय. ताेही गुंतवणूक- इन्व्हेस्टमेंट करताेय! गुंतवणुकीतच सर्व जग आहे.जाे माणूस प्रेम मागताे ताे मित्र-शत्रू यामध्ये सम राहू शकत नाही. जाे प्रेम मागण्याच्या पलीकडे गेला ताे प्रेम द्यायला समर्थ झाला.या तिसऱ्या सूत्रात त्याचा निर्देश आहे. ताेच समबुद्धीला उपलब्ध हाेऊ शकताे. ज्याला प्रेम द्यायचं आहे आणि घ्यायचं नाहीये. ताे मित्रालाही देऊ शकताे. शत्रूलाही प्रेम देऊ शकताे. कारण घेण्याचा तर काही प्रश्नच नाही.त्यामुळे फरक करण्याची पण काही गरज नाही.मी ऐकलंय. येशू ख्रिस्त एक गाेष्ट सांगत असत.
 
ती गाेष्ट हे समजून घ्यायला उपयाेगी पडेल. येशूही ही गाेष्ट प्रेम समजावण्यासाठीच सांगायचे. कधी कधी येशूचे शिष्य त्यांना विचारीत असत. मी आपली एवढी सेवा करताे. पण आपण मला जेवढं प्रेम देता तेवढंच प्रेम ज्यानं आपली कधीही सेवा केली नाही त्याला देता.
मी गेली कित्येक वर्ष आपल्याबराेबर दाराेदार फिरताेय.पण आपण मला जेवढं प्रेम देता तेवढंच प्रेम रस्त्यात पहिल्यांदा भेटलेल्या अनाेळखी माणसाला देता.तेव्हा येशू एक गाेष्ट सांगायचे की एक खूप श्रीमंत माणूस हाेता. ताे इतका श्रीमंत हाेता की, त्याचं काही गणितच नव्हतं; पण येशू सांगत की ताे श्रीमंत हाेता ताे गडगंज संपत्ती जवळ हाेती म्हणून नव्हे, तर यासाठी की त्याला धनाची आस्नती राहिली नव्हती.