जास्त पाणी व ज्यूस प्या व किडनी स्टाेनपासून वाचवा

    09-Dec-2025
Total Views |
 

juice 
 
जर एखाद्याच्या किडनीत स्टाेन हाेताे तेव्हा त्याला याची जाणीव व्हायला वेळ लागत नाही.याच्या वेदना भयंकर सुळाप्रमाणे टाेचणाऱ्या व असह्य असतात. या राेगासांबत असाही त्रास हाेताे की जर किडनीत एक स्टाेन बनला तर दुसरा व तिसराही हाेण्याची श्नयता असते. यासाठी किडनीत स्टाेन असल्याचे कळताच काही उपाय त्वरित सुरू करायला हवेत. ज्यामुळे आणखी स्टाेन हाेण्यापासून राेखता येऊ शकेल.किडनी स्टाेन हाेण्याचे सर्व मूह वा आवश्यक घटक मूत्रात असतात.फास्फेट, यूरिक अ‍ॅसिड, कॅल्शियम व आ्नसलेट इ. आ्नसलेट हे याैगिक जवळपास सर्व फळभाज्यात व अन्नात असते. सामान्यत: हे सारे घटक काेणत्याही त्रास वा अविरघळीत अवस्थेत असेच राहतात पण जेव्हा यापैकी एखाद्या याैगिकचे प्रमाण वाढू लागते तेव्हा ते पूर्ण संतुलन गडबडवू शकते. याममुळे छाेटे छाेटे क्रिस्टलसारखे स्टाेन बनू लागतात.कधी कधी काही एखाददुसरा स्टाेन किडनीत राहाते आणि वाढीसाेबत किडनीची हानी करू लागताे. पण सामान्यत: हे स्टाेन मूत्र किडनीतून ब्लँडरपर्यंत नेणाऱ्या मूत्रवाहिनीत येताे.
 
यामुळे मूत्रात अडथळा आल्यामुळे एक दबाव बनताे व खूप तीव्र वेदना हाेतात.सामान्यत: हे स्टाेन 72 तासांत मूत्रासाेबत विसर्जित हाेतात, पण जे बाहेर येऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी उपचारी दीर्घ प्रक्रिया असते. सुयाेग्य परीक्षणांनंतर लिथाेट्रिप्सी व यूरेटराेस्काेपी इ. तंत्रांनी हे बाहेर काढतात.किडनी स्टाेनपासून वाचण्याचा उत्तम उपाय आहे पाणी व द्रपदार्थांचे सेवन. विशेषत: उन्हाळ्यात. द्रवपदार्थ मूत्र पातळ करते. ज्यामुळे स्टाेन निर्माते घटक साचू शकत नाहीत आणि सामान्यत: स्टाेन वाढणे व बनणे टाळता येते. यासाठी दिवसभरात 8 ते 12 ग्लास द्रवपदार्थ व पाणी पिणे अत्यंत लाभकारक राहते.किडनी स्टाेनशी संधित एक समज हाेता की कॅल्शियमचा खुराकामुळे हा त्रास हाेताे. पण हे खरे नाही अशावेळी डाॅ्नटर कमी मीठ खाण्याचा व भरपूर फळभाज्या खाण्याचा सल्ला देतात.याशिवाय तंतुमय धान्य, जव, बाजरी, ज्वारी, चवळी व काळा हरभरा इ.खाणे उपयुक्त राहते.