देशात महाराष्ट्र हे साैर ऊर्जेचा शेतीत सर्वाधिक वापर करणारे राज्य ठरले आहे.शेतकऱ्यांसाठी फीडर साैर ऊर्जेवर आणून स्वतंत्र 16 हजार मेगावाॅट वीजनिर्मिती करू. त्यामुळे अन्य वापरातील विजेच्या दरात आपण दरवर्षी 3 ट्नके कपात करून ग्राहकांना स्वस्त वीज देऊ शकताे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.मागेल त्याला साैर कृषिपंप याेजनेत महाराष्ट्राने विश्वविक्रम केला आहे.महावितरणने एकाच महिन्यात 45911 साैर कृषिपंप स्थापित करण्याचा उच्चांक गाठला. या विक्रमाची गिनीज बुकमध्ये यशस्वी नाेंद झाली. गिनीज बुकतर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान साेहळा शेंद्रा एमआयडीसीतील ऑरिक सिटी मैदानावर पार पडला. या विश्वविक्रमाच्या घाेषणेसाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड्सचे कार्ल सॅबेले हेही यावेळी उपस्थित हाेते.
या साेहळ्यास अपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री मेघना साकाेरे बाेर्डीकर, आमदार सर्वश्री संजय केणेकर, अनुराधा चव्हाण, नारायण कुचे, प्रशांत बंब, सुरेश धस, मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार तथा ‘मित्रा’चे संचालक प्रवीण परदेशी, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लाेकेश चंद्र, सहव्यवस्थापकीय संचालक आदित्य जिवने, सहसचिव (ऊर्जा) नारायण कराड, स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, संचालक सचिन तालेवार (संचालन/ प्रकल्प), याेगेश गडकरी (वाणिज्य), राजेंद्र पवार, कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर, मुख्य अभियंता पवनकुमार कछाेट आदी मान्यवर उपस्थित हाेते.