चारशेहून अधिक वर्षांची परंपरा असलेली आणि पिढ्यान् पिढ्या आपला सांस्कृतिक ठेवा जपून ठेवणारी सारंगखेडा यात्रा; तसेच यात्रेनिमित्त हाेणारा चेतक महाेत्सव जागतिक स्तरावर नेण्यासाठी राज्य शासन भ्नकमपणे चेतक महाेत्सव समितीच्या पाठीशी असल्याची ग्वाही पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.सारंगखेडा येथे चेतक महाेत्सवाचे उद्घाटन करताना रावल बाेलत हाेते.यावेळी जिल्हाधिकारी डाॅ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गाेयल, तहसीलदार दीपक गिरासे, शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील, चेतक महाेत्सवाचे प्रमुख आयाेजकजयपालसिंह रावल, सारंगखेड्याचे सरपंच पृथ्वीराज रावल, आयाेजन समितीचे प्रणवराज रावल आदी यावेळी उपस्थित हाेते.
महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या तीन राज्यांना व्यापून असलेल्या तापी नदीच्या तीरावर हा महाेत्सव आणि यात्राेत्सव शेकडाे वर्षांपासून आपली परंपरा घेऊन डाैलाने उभा आहे. दत्तप्रभूंच्या उपासनेसाेबत या महाेत्सवाला जगविख्यात अशा अश्वमेळा व पशुमेळ्याची रूपेरी किनार लाभली आहे. राेज सुमारे 75 हजार लाेक या यात्रेला येतात. घाेडे पाहण्यासाठी आणि खरेदीकरण्यासाठी जगभरातून अश्वप्रेमी येथे येतात.हजाराे नागरिकांची उपजीविका या यात्रेवर आधारित आहे. या महाेत्सवाला अधिक व्यापक करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे रावल यांनी सांगितले. या प्रसंगी महाेत्सवातील अश्वांची पाहणी रावल आणि उपस्थितांनी केली.