परमात्मा अदृश्य आहे असेच आपण मानताे. पण असे मानणे अत्यंत चुकीचे आहे. परमात्मा अदृश्य नसून आपणच आंधळे आहाेत. आंधळा जर म्हणेल प्रकाश अदृश्य आहे तर जाे अर्थ हाेईल ताेच अर्थ आपल्या परमात्मा अदृश्य आहे असे म्हणण्याचा असेल.माणूस अत्यंत अद्भुत आहे. स्वत:चे अंधत्व स्वीकारणे त्रासदायक असते पण परमात्म्यालाच अदृश्य मानणे सुखद असते. आंधळ्यालाही प्रकाश नावाची काही गाेष्ट असते जी दिसत नसते असे मानणे मी आंधळा आहे असे म्हणण्यापेक्षा साेपे पडेल. आणि तरीही डाेळ्यांच्या आंधळेपणाने एवढा त्रास हाेणार नाही जेवढा माझी चेतना आंधळी आहे असे म्हटल्यामुळे हाेईल.परमात्मा अदृश्य आहे असे म्हणणारे फक्त आपले अंधत्व झाकून चालत असतात. डाेळे उघडे असतील तर परमात्माही दृश्य आहे. न दिसणे हा अदृश्य असल्याचा पुरावा नाही. अनिवार्य रुपात अंधत्वाचा पुरावा असू शकताे.
कृष्ण सांगतात, ज्याने सर्व भूती एकाला आणि एकातच सर्व भूतांना अनुभवले त्याच्यासाठी मी ना अदृश्य आहे, ना ताे माझ्यासाठी अदृश्य आहे.यामध्ये आणखी एक अद्भुत गाेष्ट सांगितली आहे. सर्वप्रथम त्यांच्यासाठी मी अदृश्य नाही आणि याहूनही अद्भुत गाेष्ट कृष्णाने सांगितली आहे की ते माझ्यासाठी अदृश्य नाहीत. कारण आपण परमात्मा अदृश्य आहे ही गाेष्ट आपल्या अंधत्वाने समजून घेऊ, पण परमात्म्यासाठी आपण अदृश्य आहे हे आपण कसे समजायचे.आकार प्रत्येक वस्तूचा वेगळा आहे.प्रत्येक वस्तूचे गुण वेगळे आहेत. प्रत्येक वस्तू वेगवेगळी आहे. पण वेगळेपणातही एकरूपता पाहू शकताे. यूनिटी इन डायव्हर्सिटी. ताे जाे एवढा अनेकानेक हाेऊन दिसून येत आहे ताे काेठेतरी खाेलवर एकच आहे.