आमच्या शाळेत मुलगा हाेता. ताे अभ्यासात अतिशय हुशार हाेता. त्याला नेहमी 97 ते 98 टक्के गुण मिळत असत.ताे शिष्ट हाेता आणि सर्वसामान्य मुलांपासून नेहमी लांब राहायचा.जेव्हा वर्गात एखाद्याकडून चूक हाेत असे किंवा बाेलताना अडखळत असे तेव्हा ताे त्या विद्यार्थ्याची टर उडवत असायचा.एकदा त्याच्या मित्राची वर्गातील दुसऱ्या मुलाशी भांडणे झाली. त्याने मित्राला थांबवले आणि म्हणाला, तीळमात्र किंमत नसलेल्या सामान्य दर्जाच्या मुलांशी वाद घालून तू स्वतःचा वेळ का वाया घालवताे आहेस? दुसऱ्या मुलाला वाईट वाटले पण ताे काही म्हणाला नाही. त्याने वर्गशिक्षिकांना सगळे सांगितले.दुसऱ्या दिवशी सकाळी वर्गशिक्षिक वर्गात आल्या तेव्हा त्यांनी त्या हुशार मुलाला उभे राहायला सांगितले आणि म्हणाल्या, लक्षात ठेव सामान्य दर्जाचा विद्यार्थी हा माणुसकी नसलेल्यांपेक्षा कितीतरी श्रेष्ठ असताे. तुम्ही आयुष्यात काय कमावता किंवा काय करता हा तुमचा प्रश्न आहे. त्यावरून तुम्ही काही समाजावर उपकार करत नाही. त्यामुळे यापुढे सगळ्यांशी आदराने वाग.
त्या घटनेनंतर ताे विद्यार्थी पुन्हा तसेच वागला की, सगळे त्याला एकाकी पाडतअसत. (हाेय ताे बदलला नव्हता.) माझ्या सगळ्या आयुष्यात मी पाहिलेले आहेकी, काही लाेक सामान्य व्यक्तींना किरकाेळ समजतात. ते त्यांना कमी लेखतात. स्वतःसारखे हाेण्याचा किंवा इतर एखाद्या यशस्वी व्यक्तीप्रमाणे हाेण्याचा सल्ला देतात.स्वतःला जिनियस समजणाऱ्या सगळ्यांना माझे एकच उत्तर आहे - माझे आयुष्य ही माझी जबाबदारी आहे. तुम्ही तुमच्या आयुष्याकडे लक्ष द्या.माझ्या दृष्टीने यशस्वी माणूस ताेच ज्याच्या वागण्यात नम्रता आहे, मदतशील आहे आणि जाे तणावमुक्त जीवन जगताे.बाकीचे सगळे जसे आहेत तसे असतील.मला त्यांची िफकीर नाही.आर्थिक आघाडीवर सामान्य असण्यात काहीही गैर नाही. माणूस म्हणून सामान्य असू नये.