महाराष्ट्रातील दिव्यांगजनांच्या कल्याणासाठी कार्यरत संस्था आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय दिव्यांगजन सशक्तीकरण पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून विज्ञान भवनात आयाेजित साेहळ्यास केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डाॅ. वीरेंद्र कुमार आणि दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या सचिव बी.विद्यावती यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित हाेते.नागपूरच्या अबाेली जितना यांना सर्वाेत्कृष्ट दिव्यांगजन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुण्याच्या भाग्यश्री मनाेहर नादी मित्तला कन्ना यांना व धृती रांकाला श्रेष्ठ दिव्यांग बाल-बालिका श्रेणीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रसिद्धऑडिओलाॅजिस्ट आणि समाजसेविका देवांगी दलाल (विलेपार्ले, मुंबई) यांनाही पुरस्कृत करण्यात आले. संस्था श्रेणीत जय वकील फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर (मुंबई) या संस्थेला बाैद्धिक आणि विकासात्मक दिव्यांगता असलेल्या व्यक्तींच्या सशक्तीकरणासाठी सर्वाेत्कृष्ट संस्था म्हणून गाैरवण्यात आले.डिजिटल सुगमता क्षेत्रात महत्त्वाचे काम करणाऱ्या बॅरियर ब्रेक साेल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडला (मुंबई) सर्वाेत्कृष्ट सुगम्य माहिती तंत्रज्ञान श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार विजेत्यांचे राष्ट्रपतींनी अभिनंदन केले.