थकबाकी वसुलीसाठी नवी मुंबई पालिकेचा मालमत्ताकर विभाग ‘अ‍ॅक्शन माेड’वर

    05-Dec-2025
Total Views |
 
 


NM
 
नवी मुंबई महापालिकेचा मालमत्ता कर विभाग ‘अ‍ॅक्शन माेड’वर आला असून, थकबाकीदादारांना जप्तीपूर्व नाेटीस बजावण्यात आल्या आहेत. नवी मुंबई महापालिका मालमत्ताकर विभागाकडून थकबाकीदारांविरुद्ध जप्तीपूर्व नाेटीस बजावण्यास सुरुवात झाली आहे. एकूण थकबाकीदारांपैकी आतापर्यंत 645 नागरिकांना 7 दिवसांची जप्तीपूर्व नाेटीस बजावण्यात आली असून, 218 नागरिकांना 48 तासांची जप्तीपूर्व नाेटीस बजावण्यात आली आहे. थकबाकीदारांनी तातडीने कर न भरल्यास पुढील टप्प्यात पालिकेकडून प्रत्यक्ष जप्तीच्या कारवाईला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती मालमत्ता विभागाने दिली. मालमत्ताकर हा महानगरपालिकेच्या महसुलाचा सर्वांत महत्त्वाचा स्राेत असून यातूनच नागरिकांना विविध सेवा सुविधांची पूर्तता केली जाते. त्यामुळे थकबाकीदारांना दिलेली जप्तीपूर्व नाेटीस ही अंतिम सूचना आहे.
 
जप्तीसारख्या कठाेर कारवाया टाळण्यासाठी नागरिकांनी वेळेत करभरणा करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डाॅ. कैलास शिंदे यांनी केले आहे. पालिकेच्या मालमत्ता कर विभागाने आतापर्यंत 548.71 काेटींचा मालमत्ता कर गाेळा केल्याची माहिती मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त अमाेल पालवे यांनी दिली. नागरिकांना कर भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने मालमत्ताकर विभागाने सर्व डिजिटल पेमेंट पद्धती उपलब्ध करून दिल्या आहेत. व्हाॅट्स अ‍ॅप चॅटबाॅट (8291920504), My NMMC (माझी नवी मुंबई) अ‍ॅप, http://www.nmmc. gov.in ही पालिकेची वेबसाईट, तसेच प्रत्येक कर देयकावरील क्यूआर काेड स्कॅनिंग त्याचप्रमाणे यूपीआय माध्यमांद्वारे पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.