दिव्यांग कर्मचाऱ्यांना सहायक उपकरणे पुरवण्याच्या उपक्रमात महावितरणने आत्तापर्यंत राज्यभरातील 49 दिव्यांग कर्मचाऱ्यांना दुचाकी उपलब्ध करून दिल्या आहेत. आगामी सुमारे 5 हजार तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेत नियमानुसार 412 जागा दिव्यांगासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. महावितरणचे व्यवस्थापन नेहमीच दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी दिली.महावितरणचे मुख्यालय असलेल्या प्रकाशगड येथे दिव्यांग दिनानिमित्त आयाेजित कार्यक्रमात पवार बाेलत हाेते.मानव संसाधन विभागाचे महाव्यवस्थापक राजेंद्र पांडे, मुख्य औद्याेगिक संबंध अधिकारी संजय ढाेके यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित हाेते.दव्यांगजन सर्वच क्षेत्रात स्वकर्तृत्वाने यशाची उत्तुंग भरारी घेत आहेत.
तीव्र इच्छाशक्ती व अढळ विश्वासाच्या बळावर दिव्यांगांनी न्यूनगंडावर मात करावी, असे आवाहन पवार यांनी केले. तसेच, दिव्यांग कर्मचाऱ्यांशी काेणताही भेदभाव न करण्याची शपथ घेऊन संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. चुकीच्या पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे सेवेत येण्याचा काेणी प्रयत्न करत असल्यास, अशा बाबी तत्काळ निदर्शनास आणून देण्याची सूचनाही पवार यांनी केली.जगभरातील विख्यात दिव्यांग लेखकांची पुस्तके व पुष्पगुच्छ देऊन मुख्य कार्यालयात कार्यरत 23 दिव्यांग कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या वतीने परेश बाेरकर आणि राेहिणी साठे यांनी मनाेगत व्यक्त केले.दरम्यान, पुणे परिमंडळाच्या रास्ता पेठेतील कार्यालयात दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रभारी मुख्य अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांच्या हस्ते परिमंडळातील दिव्यांग कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.