मला कुठे पाेहाेचायचंही नाही की मला काही करायचंही नाही. मी जगताे यासाठी की परमात्म्याला माझ्याकडून जे जे करवून घ्यायचं आहे ते ते त्यानं करवून घ्यावं. जितकं माझ्याच्यानं हाेईल. मी करून टाकीन. अमुक एक लक्ष्य गाठायचं अशी काही जिद्द नाहीये माझी.तर मग शत्रू-मित्र यांच्याबाबत काहीच अडचणी रहात नाहीत. मग सगळं समानच हाेऊन जातं.म्हणूनच जर मी पहिली गाेष्ट आपणाला काेठली सांगू इच्छित असेन तर ती ही, की ज्याला जीवन हे एक कर्म समजण्याचा अज्ञानीपणा आला आहे किंवा जीवनात काहीतरी करण्याचा विचार आला आहे. ताे व्य्नती शत्रू आणि मित्र निर्माण करेलच आणि ताे त्याबद्दल समभावही ठेवू शकणार नाही.
दुसरी गाेष्ट ही सांगाविशी वाटते की, शत्रू- मित्र याबाबत समभाव ठेवणं तेव्हाच श्नय हाेतं जेव्हा आपणामधील प्रेम मिळविण्याची आकांक्षा नाहीशी हाेऊन गेली असेल. ही पण गाेष्ट नीट समजून घ्यायला पाहिजे.आपणा सर्वांचंच मन असं असतं की अगदी मरेपर्यंतदेखील प्रेम मिळविण्याची इच्छा आपला पिच्छा साेडत नाही. जन्माच्या पहिल्या दिवशीसुद्धा तान्हे मूल प्रेम मिळविण्यासाठी तितकेच आतुर असते. जितका शेवटचा श्वास लागलेला म्हातारा प्रेमासाठी आतुर असताे. प्रेम मिळविण्याची आतुरता, इच्छा असतेच. फ्नत त्याचा प्रकार वेगळा असताे; पण काेणीतरी दुसऱ्यानं आपणावर प्रेम करावं, काेणीतरी मला प्रेम द्यावं...मला जर प्रेमाचं भाेजन मिळालं नाही तर मी उपाशी मरेन, माेठी अडचण हाेईल माझी.