कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासह वारसा जपणार

    04-Dec-2025
Total Views |
 
 

nse 
‘दक्षिण गंगा असलेल्या गाेदावरीच्या स्वच्छतेसाठी नागरिक व गुंतवणूकदारांनी दिलेला उत्स्फूर्त सहभाग काैतुकास्पद आहे.विकास भी, विरासत भी हा पंतप्रधानांचा संदेश मार्गदर्शक असून, कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासाेबत ऐतिहासिक वारशाचेही जतन करण्यात येईल,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.नॅशनल स्टाॅक एक्सचेंजमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नाशिक महापालिकेचा क्लीन गाेदावरी बाँड समारंभपूर्वक सूचिबद्ध करण्यात आला. या कार्यक्रमास मुख्य सचिव राजेश अग्रवाल, नगरविकास विभागाचे अतिर्नित मुख्य सचिव डाॅ. के.एच. गाेविंदराज, नॅशनल स्टाॅक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक आशिष चाैहान, ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, विभागीय आयु्नत डाॅ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा आयु्नत शेखर सिंह, नाशिकच्या आयु्नत मनीषा खत्री उपस्थित हाेत्याकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या पायाभूत सुविधांच्या विकासात महापालिका महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
 
नाशिक परिसरात माेठ्या प्रमाणावर विकासकामांची संधी उपलब्ध हाेत असून, ऐतिहासिक वारसा जपतानाच जीवनदायिनी गाेदावरीच्या स्वच्छतेसाठी महत्त्वपूर्ण काम हाेत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.महापालिकेच्या क्लीन गाेदावरी बाँडला गुंतवणूकदारांकडून सबस्क्रिप्शनसाठी मिळालेला चाैपट प्रतिसाद ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आर्थिक सक्षमता, रेटिंग आणि पारदर्शक प्रक्रियेची पावती आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाच्या कंपन्यांच्या क्षमतेस चालना देण्यासाठी नॅशनल स्टाॅक एक्सचेंजच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात निधी उपलब्ध हाेईल. पहिल्या टप्प्यात महापारेषण (एमएसईटीसीएल) त्यानंतर महावितरण आणि महानिर्मिती या कंपन्या सूचीबद्ध करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.