शरीरावर आपल्याद्वारे केलेल्या प्रत्येक क्रियेचा प्रभाव पडत असताे.रडणेही एक अशी क्रिया आहे, जी शरीर, मन व आराेग्यावर माेठा प्रभाव टाकत असते. शारीरिक वा मानसिक दाेन्ही त्रासांमुळे रडू येत असते.रडल्यामुळे श्वासाचा वेग वाढताे, डाेळे पाण्याने भरतात आणि बाेलण्यात अडथळा उत्पन्न हाेत असताे.डाेळ्यांच्या ग्रंथीतून अश्रू वाहतात.जन्मापासून मरेपर्यंत व्यक्ती बऱ्याचदा रडते. रडणे आराेग्यासाठी चांगले असते.जेव्हा रडू येते तेव्हा ते राेखू नये. असे केल्यास अनेक राेग हाेऊ शकतात.रडल्यामुळे मन शांत हाेते. डाेळे स्वच्छ हाेतात आणि डाेळ्यांना आराम मिळताे. प्रत्येक व्यक्तीची जशी हसण्याची पद्धत वेगळी असते तशीच रडण्याचीही पद्धत वेगळी असते.
उदाहरणार्थ सावकाश रडणे, उच्च स्वरात रडणे, हमसून हमसून रडणे, मनातल्या मनात रडणे, हुंदके देत रडणे, अश्रूंविना रडणे इ. काही व्यक्ती रउल्यानंतर एखाद्याने विचारल्यास अधिक जाेरात रडू लागतात. मुले कधी कधी रागावल्यानंतर गप्पही हाेतात. काहीजण एखाद्याला पाहिल्यास रडणे थांबवतात.जेव्हा रडण्याची प्रक्रिया हाेत असते तेव्हा शरीरात वायू उत्पन्न हाेत असताे. हा शरीरातून रडल्यासच निघू शकताे. यासाठी जर रडले नाही तर हा वायू शरीात नुकसान करताे ज्यामुळे वायुगाेळा, पाेटदुखी व इतर राेग हाेण्याची श्नयता राहते.डाेळ्यांमध्ये सततच अश्रुग्रंथींमध्ये अश्रूंची निर्मिती हाेत राहात असते. जर रडल्यास ते बाहेर पडले नाहीत तर ते दूषित हाेतात.रडल्यानंतर प्रसन्न हाेण्याचा प्रयत्न करायला हवा. यामुळे शरीराला फायदा हाेताे. अधिक रडल्यामुळे डाेळ्यांचे विकार, मानसिक राेग, आळस, थकवा, चक्कर इ. राेग हाेतात त्यामुळे प्रसन्नचित्त राहण्याचा प्रयत्न करायला हवा.