महापरिनिर्वाण दिनासाठी साेयीसुविधा द्या: मुख्यमंत्री

    04-Dec-2025
Total Views |
 

CM 
 
देशभरातून महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनासाठी चैत्यभूमी परिसर; तसेच मुंबईत येणाऱ्या अनुयायांची सुरक्षितता आणि साेयीसुविधांसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. चैत्यभूमीवर उभारल्या जाणाऱ्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासंदर्भात विविध सूचना प्राप्त झाल्या असून, याबाबत समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.महापरिनिर्वाण दिनानिमित्त पूर्वतयारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालीसह्याद्री अतिथिगृहात आढावा बैठक झाली.
 
सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, माजी मंत्री विजय गिरकर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पाेलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई महापालिकेचे आयु्नत भूषण गगराणी, काेकण विभागीय आयु्नत डाॅ. विजय सूर्यवंशी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, बेस्टच्या महाव्यवस्थापक साेनिया सेठी, मुंबईचे पाेलीस आयु्नत देवेन भारती, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गाेयल, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव तसेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित हाेते.
 
अनुयायांची व्यवस्था, सुरक्षा, आराेग्य व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बससेवा, भाेजनव्यवस्था, चैत्यभूमी परिसरात वाॅटरप्रूफ मंडप, स्वच्छतागृहे, वाहतूक व्यवस्थेचे नियाेजन, पुष्पवृष्टी, सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर सर्व साेयीसुविधांचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.महापरिनिर्वाण दिनानिमित्त तयार करण्यात आलेल्या पाेस्टरचे अनावरण; तसेच माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.