विवेकाच्या सदुपयाेगाने घ्या आपले निर्णय

    31-Dec-2025
Total Views |
 

vivek 
 
स्वत:वर विश्वासाचा अभाव आणि इतरांना खूश करण्याचा प्रयत्न नेहमी आपल्याला गुंतवून टाकताे. आपले निर्णय अपेक्षांवरअवलंबून असावेत, भीतीव नव्हे.आपला विवेकच आपल्याला बाह्य कारकांविषयी सांगताे. साेबतच आपण आपल्या मनाला प्रामाणिकपणे चाचपू शकताे.आपली भीती स्वीकारा स्वत:ला विचारा की काेणती गाेष्ट आपल्याला सर्वांत जास्त घाबरवते. आपली भीती, वाईट विचार आणि स्वत:वरील विश्वासाचा अभाव ओळखा. विचार करा की त्या निर्णयाचा वाईट परिणाम काय हाेऊ शकताे. ही संधी नवे शिकण्याच्या व पुढे जाण्याच्या दृष्टीतून पहा.प्रतिक्रियेकडे लक्ष द्या त्या गाेष्टीवरून आपली सर्वांत पहिली जी प्रतिक्रिया असेल तिच्याकडे दुर्लक्ष करू नका. त्या प्रतिक्रियेच्या कारणांचा विचार करा.
 
अशाप्रकारे आपण आपले पूर्वग्रह, गतकाळासंबंधित आपले अनुभव समजू शकाल. अशाप्रकारे आपली सहज प्रतिक्रिया, निर्णय घेण्याची प्रतिक्रिया, निर्णय घेण्याची प्रक्रिया आवश्यक अंग बनवू शकता.मुळापर्यंत जा आपल्या सर्व पर्यायांवर लक्ष दिल्यानंतर निर्णयाशी संबंधित प्रत्येक पैलूचा खाेलवर विचार करा. अशाप्रकारे आपण स्पष्टपणे गाेष्टींचे आकलन करू शकाल. चांगले-वाईट परिणाम समजून आपल्या निर्णयांवर आपला विश्वस वाढेल. आपण शांतपणे आपला निर्णय घेऊ शकाल.कालमर्यादा ठरवा एका उत्तम निर्णयात आपल्या माेठ्या ध्येयाचा व आवडीनिवडीचा विचारही सामील असताे. गडबडीत नेहमी आवश्यक पैलू सुटून जातात. याचा अर्थ हा नाही की, आपण फक्त विचार करीत राहावे. एक कालमर्यादा ठरवा.
 
राेजच्या छाेट्या छाेट्या निर्णयांसाठी दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ घेऊ नये. माेठ्या निर्णयात मत बनवण्यासाठी थाेडा वेळ लागू शकताे. पण यातही दीर्घकाळपर्यंत गुंतून राहू नये. हळू हळू आपल्या समस्या वेगाने साेडवण्याचे काैशल्य निर्माण हाेईल.स्वत:कडे दुर्लक्ष करू नये कित्येकदा आपण अशी निवड करताे ज्यामध्ये इतरांचा आनंद तर सामील असताे पण त्यात आपण आपले मूल्य नसते. अशा वेळी ताे निर्णय आपल्या विचार व गरजेपासून दूर हाेताे.थाेड्या वेळासाठी तर आपल्याला आनंद हाेताे पण ताे उशीरपर्यंत टिकू शकत नाही. लक्षातठेवा त निर्णयांनी आपल्या संतुष्टी मिळते जे आपल्या दीर्घकालीन लक्ष्यांशी संबंधित असतात.