सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांचा अधिवास वाढवण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल म्हणून 79 चितळ साेडण्यात आले आहेत. गेल्याच आठवड्यात चांदाेलीत तारा वाघिणीला साेडण्यात आले आहे.आणखी सात वाघ भविष्यात येथे येणार असून, त्यांच्यासाठी हे चितळ खाद्य म्हणून उपयु्नत ठरणार आहेत.या संदर्भात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टदरम्यान वन्यजीव व्यवस्थापनासाठी करार झाला आहे. त्यानुसार वन्य प्राण्यांचे व्यवस्थापन, पशुवैद्यकीय मदत, वन्य प्राण्यांसाेबत तेथील पाळीव पशूंचीही सुरक्षा आदी बाबतीत या दाेन्ही संस्था एकत्रित काम करणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून चांदाेलीत चितळ साेडण्यात आले.यामुळे वन्य प्राण्यांचे व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे पार पडणार आहे, अससह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांनी सांगितले. विविधतेने समृद्ध असणाऱ्या सह्याद्री खाेऱ्यात आम्हाला अधिक चांगल्या प्रकारे काम करता येणार आहे, असे रेस्क्यू ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्षा नेहा पंचमिया यांनी सांगितले वन विभागाने रेस्क्यू संस्थेच्या मदतीनगेल्या दाेन दिवसांत 79 चितळ चांदाेली राष्ट्रीय उद्यानात साेडले.
हे सर्व चितळ साेलापूर जिल्ह्यातून तीन ट्रकमधून आणले हाेते. साेलापूर जिल्ह्यात खूपच माेठ्या संख्येने चितळांचा वावर आहे. त्याशिवाय सागरेश्वर अभयारण्यासह महाराष्ट्रभरातून अतिर्नित असणारे चितळ टप्प्याटप्प्याने चांदाेलीत आणले जाणारआहेत.राज्यात अनेक ठिकाणी हरणे, चितळांचा शेतीला उपद्रव हाेत असल्याच्या तक्रारी आहेत. खाद्याच्या शाेधात ती शेतात शिरून पिकांची हानी करतात.चांदाेली अभयारण्यासह सह्याद्री खाेऱ्यात त्यांच्यासाठी मुबलक खाद्य असल्याने ती येथे रुजतील, अशी अपेक्षा आहे.दरम्यान, चंद्रपूर व ताडाेबा परिसरातून आणखी सात वाघांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणले जाणार आहे. त्यामुळे येथील वाघांची संख्या आठवर जाणार आहे. त्याशिवाय या परिसरात पूर्वीपासून फिरणारे दाेन ते तीन वाघ आहेत.नव्याने वाघ आल्यानंतर त्यांचीही पैदास वाढणार आहे. ही वाढती संख्या पाहता त्यांच्यासाठी चांदाेलीत पुरेसे खाद्य आवश्यक आहे. खाद्य मिळाले तरच वाघ चांदाेलीत रमतील. हे लक्षात घेऊन येथे चितळांची संख्या वाढवण्याकडे वन विभाग लक्ष देत आहे.