अपर जिल्हाधिकारी सुचिता भिकाने यांचा सेवारत्न पुरस्काराने गाैरव

    03-Dec-2025
Total Views |
 
 
upper
 
साईदिशा प्रतिष्ठान व आयटीएसएफच्या वतीने शासकीय सेवा विभागात दिला जाणारा ‘सेवारत्न’ पुरस्कार अपर जिल्हाधिकारी तथा राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) कार्यकारी संचालक (मानव संसाधन) सुचिता भिकाने यांनी नुकताच स्वीकारला. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत व राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 25व्या नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार वितरण साेहळ्यात भिकाने यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 
अभिनेते मकरंद देशपांडे, भाऊ कदम, सिद्धार्थ जाधव, मुरली शर्मा, पार्श्वगायक कुमार शानू, अभिनेत्री सई ताम्हणकर, साईदिशा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय माने यावेळी उपस्थित हाेते.भिकाने यांनी उत्कृष्ट शासकीय सेवेबराेबरच प्राण्यांची देखभाल, गाेरक्षा, निसर्ग संरक्षणासाठी माेठे काम केले आहे. विशेषतः रस्त्यावरील भटक्या प्राण्यांसाठी व पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. लाेकसभा व विधानसभा निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उत्कृष्ट काम केले आहे. सांगलीत राेजगार हमी याेजना, जलयु्नत शिवार अभियान व शतकाेटी वृक्षलागवडीत त्यांनी याेगदान दिले आहे.