महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीचा विभागीय आयु्नतांकडून आढावा

    03-Dec-2025
Total Views |
 
 

dff 
भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर लाखाे अनुयायी अभिवादनासाठी येतात. या अनुयायांना पुरवण्यात येणाऱ्या आवश्यक साेयी-सुविधांच्या पूर्वतयारीचा आढावा काेकण विभागीय आयु्नत डाॅ.विजय सूर्यवंशी यांनी घेतला.या बैठकीस मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गाेयल, काेकण विभाग अपर आयु्नत फराेग मुकादम, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी; तसेच संबंधितविभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते.
 
महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रत्येक विभागाने आपापली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडावी. चैत्यभूमी परिसरात वाहतूक काेंडी हाेऊ नये, या दृष्टिकाेनातून पाेलीस बंदाेबस्ताबाबत काटेकाेर नियाेजन करावे.चैत्यभूमी परिसरातील स्वच्छता, साफसफाईबाबत संबंधित यंत्रणांनी जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश डाॅ.सूर्यवंशी यांनी दिले. बैठकीत नियंत्रण कक्ष, आराेग्यसेवा, रुग्णवाहिका, रेल्वे व्यवस्था, बेस्ट आणि एसटी व्यवस्था, पिण्याचे पाणी, भाेजन व्यवस्था, सीसीटीव्ही देखरेख या संदर्भातही विभागीय आयु्नतांनी निर्देश दिले.