गेल्या काही काळापासून रेस्टाॅरंटमध्ये ‘बिलिंग साॅफ्टरवेअर’ची मागणी माेठ्या प्रमाणात वाढली आहे.दुबई अशा तंत्रज्ञानामध्ये एक पाऊल पुढे असून, तिथे ‘एआय पाॅवर्ड रेस्टाॅरंट’ सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी ‘आयमान’ नावाचा ‘एआय शेफ’ अल्गाेरिधमच्या मदतीने मेनू डिझाईन करीत असून, फ्लेवर प्राेफाईल्स देखील बनवता आहे. यानंतर प्रत्येक पदार्थातील अॅसिडिटी लेव्हल चेक करून अत्यंत उत्तम पदार्थ तयार करीत आहे.हे ऐकून सहज असा प्रश्न निर्माण हाेताे आहे की, आता शेफच्या नाेकऱ्या पण धाे्नयात येणार का? या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असे आहे. हा शेफ फक्त मेनू डिझाईन करण्यासाठी मदत करताे. प्रत्येक एआय माॅडेलप्रमाणे हा पण तुमचे काम दर्जेदार हाेण्यासाठी मदत करताे आहे.
ते तुमचे काम करू शकत नाहीत. इंटरॅ्निटव्ह एआय माॅडेलप्रमाणे ते फीडबॅक देऊ शकत नाहीत. हे आय माॅडेल रेस्टाॅरंटसाठी फायदेशीर ठरते आहे.फ्रीजमध्ये ठेवलेली भाजी आणि अन्य माहितीच्या आधारे पदार्थ बनवण्यात येतात, यामुळे खर्चात बचत हाेते आहे.रेस्टाॅरंटमधील खऱ्या शेफना याेग्य रेसिपी मिळत असल्याने त्यांना देखील ते फायदेशीर ठरत आहे.भविष्यात रेस्टाॅरंटला ‘डिजिटल आर्ट इन्स्टाॅलेशन आणि री-अॅ्निटव्ह एलइडी डीसप्लेबराेबर जाेडण्यात ही संरचना फायद्याची आहे. डायनिंग रूममधून निघाल्यावर तुमच्या हालचालीवर या लायटिंगमुळे निरीक्षण ठेवता येणार आहे.