विस्मरण टाळण्यासाठी दात राेज दाेन वेळा ब्रश करायला हवेत

    29-Dec-2025
Total Views |
 

brush 
 
दात स्वच्छ करण्याची पहिली पायरी म्हणजे दिवसातून दाेनदा, किमान दाेन मिनिटे दात घासणे. तथापि, जर तुम्ही व्यवस्थित दात घासले नाहीत, तर दातांवर प्लाक आणि टार्टर जमा हाेऊ शकताे, ज्यामुळे दात किडणे आणि हिरड्यांचे आजार हाेऊ शकतात.
दातांची सफाई केल्यामुळे श्वसनाचा त्रास आणि ताेंडाचे इतर आजार हाेत नाहीत. यासाेबतच एक अलीकडील शाेध सांगताे की, स्मरणश्नती उत्तम राखण्यासाठीही दातांची सफाई आवश्यक आहे. या शाेधानुसार वयस्करांनी दातांची याेग्य निगा राखली म्हणजेच नियमित ब्रश केल्यास स्मरणश्नती राखण्यास मदत हाेते. पूर्वीच्या अनेक शाेधांमध्येही दातांची साफसफाई व्यवस्थित न करणे डिमेंशियासह हृदयराेग, स्ट्राेक व डायबिटीससारख्या व्याधींना जबाबदार धरले आहे. न्यूयाॅर्कच्या काेलंबिया काॅलेजच्या संशाेधकांच्या मते हिरड्यांचा आजार मेंदूच्या क्रियांवर परिणाम करून संपूर्ण शरीरात जळजळ निर्माण करताे.
 
संशाेधनात 60 वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाच्या लाेकांना सामील केले गेले ज्यांच्यामध्ये हिरड्यांच्या आजाराला जबाबदार पॅथाेजन जास्त आढळले.त्यांच्यात स्मरणासंबंधित अडचणी दिसून आल्या. मुख्य संशाेधक डाॅ. जेम्स नाेबल सांगतात की, ज्या लाेकांमध्ये पॅथाेजन उच्च पातळीत आढळले त्यांच्यामध्ये स्मरणश्नतीचा गंभीर त्रास आढळला.संशाेधनातून स्पष्ट झाले की, दात- हिरड्यांची याेग्य देखभाल न केल्यास डिमेंशियाचा धाेका निर्माण हाेऊ शकताे.जर्नल ऑफ न्यूराेलाॅजी, न्यूराेसर्जरी अँड सायकाइट्रीत प्रकाशित रिपाेर्टनुसार सुमारे 2400 पुरुष व महिलांवर केलेल्या संशाेधनात दातांचे आजार स्मरणश्नतीवर परिणाम करणारे आढळून आले.दातांच्या आजाराने पीडित 5.7 ट्नके लाेकांना स्मरणश्नतीची सामान्य समस्या आढळून आली, तर 6.5 ट्नके लाेकांना री-काॅल (पुन्हा आठवणे) व 22.1 ट्नके लाेकांमध्ये सतत विस्मरणाचा त्रास आढळला.