वीर बाल दिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू यांच्या हस्ते 20 मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरच्या अर्णव महर्षीला गाैरवण्यात आले.महिला व बाल विकास मंत्रालयाने आयाेजिलेल्या समारंभात राष्ट्रपतींनी सात क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीसाठी देशभरातील 20 बालकांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-2025’ प्रदान केले.यापैकी दाेघांना हा पुरस्कार मरणाेत्तर प्रदान करण्यात आला. या पुरस्कारार्थ्यांमध्ये 9 मुले आणि 11 मुलींचा समावेश आहे.
यावेळी केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी, राज्यमंत्री सावित्री ठाकूर आणि सचिव अनिल मलिक उपस्थित हाेते.महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरचा17 वर्षीय अर्णव महर्षीला विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्कृष्ट याेगदानासाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आला. अर्णवने लकवाग्रस्त रुग्णांच्या हातांसाठी एआयआधारित पुनर्वास उपकरण आणि अॅक्टिव्ह हँड रिस्ट बँडचा शाेध लावला आहे. अर्णवने स्मार्टफाेन किंवा लॅपटाॅपच्या मदतीने हे नवीन उपकरण विकसित केले आहे.पदक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.