लाेकनेते माेहनराव कदम कृषी महाविद्यालय, कडेगाव येथील कृषिदूतांचे पथक ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम व कृषी औद्याेगिक जाेड अभ्यासासाठी नुकतेच भाळवणी (ता. खानापूर) येथे दाखल झाले. त्यांचे ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केले. महाविद्यालयाचे प्रा. व्ही. एस. शिंदे, कार्यक्रम अधिकारी प्रा.चारुदत्त अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत अनुप नवलाई, अनिरुद्ध काेळेकर, स्वरूप पाटील, अनुज वेर्णेकर, साहिल महाडिक यांनी शतकऱ्यांशी संवाद साधला.कृषिदूतांनी ग्रामीण भागातील कृषीमित्रांना उत्तम दर्जाची शाश्वत व सेंद्रिय करण्याचे तंत्र; तसेच पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय यांसारख्या जाेडधंद्यांतून आर्थिक उत्पन्न कसे मिळवता येईल, याविषयी मार्गदर्शन केले. सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून पीक उत्पादन वाढवणे व शेतीचा खर्च कमी करणे यावर विशेष भर देण्यात आला. यावेळी गावाचे सरपंच आनंदराव अधाटे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.