तरुणसागरजी

    27-Dec-2025
Total Views |
 
 

tarunsagarji 
 
परमेश्वराशी संवाद साधायचा असेल, तर सर्वांत पहिल्यांदा आपली विचारसरणी बदलली पाहिजे. मनुष्य वाईट नाही.त्याच्याकडील विचार वाईट आहेत. प्रार्थना करता करताही मनुष्य हाच विचार करताे की, ‘हे देवा ! शेजारच्याचं वाटाेळं झालं की, माझं दुकान खूप चालेल.’ याला मनाेप्रदूषण म्हणतात. मनुष्याच्या आहाराबराेबरच प्रार्थनासुद्धा आता तामसी व्हायला लागलीये. हे लक्षात ठेवा की, तामसी वृत्तीने केली गेलेली प्रार्थना देवापर्यंत कधीच पाेहाेचत नाही.