यशासाठी स्पर्धा नव्हे, तर प्रेम महत्त्वाचे आहे

    27-Dec-2025
Total Views |
 
 

Health 
आजच्या काळात स्पर्धा विकास वा प्रगतीचे आधारभूत तत्त्व मानले जाते. त्यामुळे जाे ताे एका अटीतटीच्या स्पर्धेत असताे.संपूर्ण शिक्षण व्यवस्था आणि त्यातून लागणारे निकाल येन-केन प्रकारेण यशाची व्यवस्था भक्कम करताना दिसून येत आहेत. त्यामुळे प्रत्येकजण पुढे जाण्यासाठी नैतिकताअनैतिकतेच्या विचारशक्तीपेक्षा फ्नत पुढे राहण्याच्या स्पर्धेत लागलेला आहे.विद्यार्थीजीवनापासूनच पहिला येण्याच्या शर्यतीत गुंतलेले असंख्य विद्यार्थी नीति-अनीतिची उपेक्षा करून लबाडीने यश मिळवण्याला आपले सार्थक मानून घेतात, पण स्पर्धेची ही भावना प्रेमघटक अत्यंत कमकुवत करीतआहे. स्पर्धेने मानवी मनात घृणा, लाेभ आणि द्वेष यासारखे विषारी तण तयार हाेत आहे. जे प्रेमरूपी राेपे नष्ट करीत आहे.
 
स्पर्धेच्या भावनेने गणित शिकणारा एक विद्यार्थी दुसऱ्या गणित शिकणाऱ्या वद्यार्थ्याशी असलेल्या शर्यतीत पुढे जाण्याचा विचार करताे, अशावेळी ताे आपल्या प्रतिस्पर्ध्याचा द्वेष करू लागताे. खरे तर त्याने गणितावर प्रेम करायला हवे. पण येथे ताे दुसऱ्या गणित शिकणाऱ्या सहपाठीविषयी द्वेषाची भावना मनात बाळगून बसताे.ऋषीमुनींनी सांगितले आहे की, स्पर्धाजन्य यश मानवासाठी एक बाह्य अभिप्रेरक आहे तर प्रेम आंतरिक अभिप्रेरक. उत्तरराम चरितम्मध्ये भवभूती लिहितात, एखादे आतील कारणच पदार्थांना आपसात मिळवते.बाह्यगुणांवर प्रीती आश्रित नसते.’ जसे पाणी आणि दूध एकसमान, एकरंग प्रीतीत आंबट पडताच फुटत असते तसेच स्पर्धेची भावना मनात येताच प्रेमाचा संबंध नष्ट हाेत असताे.