प्रचार संपल्यानंतर प्रसार माध्यमांतून जाहिरात करण्यास बंदी : दिनेश वाघमारे

    27-Dec-2025
Total Views |
 

ec 
 
महापालिकांच्या निवडणुकांच्या प्रचाराची मुदत 13 जानेवारीस सायंकाळी साडेपाचला संपणार असल्याने त्यानंतर इलेक्ट्राॅनिक आणि मुद्रित माध्यमांसह अन्य काेणत्याही माध्यमांद्वारे निवडणूकविषयक जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत, असे राज्य निवडणूक आयु्नत दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले आहे. राज्य निवडणूक आयाेगाकडील नाेंदणीकृत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची महापालिका निवडणुकांसंदर्भात बैठक झाली. त्यावेळी ते बाेलत हाेते.आयाेगाचे सचिव सुरेश काकाणी, विविध पक्षांचे प्रतिनिधी आणि अधिकारी यावेळी उपस्थित हाेते. या निवडणुकांसाठी 15 जानेवारीला मतदान हाेणार आहे. संबंधित अधिनियमातील तरतुदींनुसार मतदान समाप्तीच्या 48 तास आधी म्हणजे 13 जानेवारीस सायंकाळी साडीपाचला जाहीर प्रचाराची मुदत संपेल.त्यानंतर माध्यमांतून काेणत्याही प्रकारची जाहिरात प्रसिद्ध अथवा प्रसारित करता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. काकाणी यांनी या प्रसंगी तपशीलवार सादरीकरण केले.