डेस्टिनेशन वेडिंग्जचा ट्रेंड आता मेट्राे सिटीज किंवा महाग जागांपुरताच मर्यादित राहिला नाही. गाेवा, उदयपूर आणि जयपूर अशा ल्नझरी स्थळांऐवजी आता मिडल ्नलास जाेड्या बजेटला अनुकूल पर्याय निवडत आहेत. त्यामध्ये ॠषिकेश, खजुराहाे, जिम काॅर्बेट, मसुरी आणि साेलन अशी शहरे वेगाने लाेकप्रिय हाेत आहेत.WedMeGood च्या रिपाेर्टनुसार ॠषिकेशमध्ये आता सुमारे 20 रिसाॅर्ट अशी पॅकेज ऑफर करतात, ज्यांची किंमत 4 ते 12 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. त्यामध्ये डेकाेरेशन, डीजे, केटरिंग आणि पाहुण्यांची व्यवस्था अशा सर्व गरजा सामील असतात. इथे डाेंगर आणि नद्यांमध्ये विवाहविधी केले जाऊ शकतात.
WedMeGood च्या सर्व्हेच्या अनुसार सन 2024 मध्ये देशातील 26% जाेड्यांनी डेस्टिनेशन वेडिंग केलहाेते. सन 2023मध्ये हा आकडा 21% आणि सन 2022मध्ये हा आकडा फ्नत 18%च हाेता. म्हणजे डेस्टिनेशन वेडिंगसाठी मागणी वाढली आहे.अशा वेळी आता टियर-2 शहरे लाेकप्रिय हाेत आहेत. या शहरात लग्नाबराेबरच पर्यटनही वेगाने वाढले आहे. स्थानिक हाॅटेल, केटरर, डेकाेरेटर आणि फाेटाेग्राफर यांना सातत्याने बुकिंग मिळत आहे. आता ॠषिकेश आणि खजुराहाे अशी शहरे केवळ पर्यटनस्थळे नाहीत, तर भारतीय वेडिंग इंडस्ट्रीची नवीन केंद्रे झाली आहेत.