श्रीमंत लाेक आता माेठी घरे केवळ चैन म्हणून खरेदी करत नाहीत, तर ते गर्दीपासून दूर असलेल्या छाेट्या गावांमध्ये मालमत्ता विकत घेत आहेत. उष्णता, धूळ आणि वाहतुकीच्या काेंडीमुळे त्रस्त झालेले हे श्रीमंत लाेक आहेत. केवळ पैशाच्या जाेरावर सुटू न शकणाऱ्या या समस्यांपासून वाचण्यासाठी शहराच्या मर्यादेबाहेर माेकळ्या हवेत आणि उन्हात, व्हिला बांधत आणि जमिनी खरेदी करत आहेत. कमी घनतेच्या लाेकवस्तीत राहण्यास प्राधान्य दिले जात असल्याने गाेवा, अलिबाग, कुन्नूर आणि कसाैली सारख्या पर्यटन स्थळांना वाढती मागणी दिसून येत आहे. ही ठिकाणे आता केवळ ख्रिसमस सारख्या सुट्ट्यांसाठीची दुसरी घरे (सेकंड हाेम्स) राहिलेली नाहीत.
‘सेकंड हाेम्स’चे महत्त्व वाढतेय : ‘हा बदल खरा घडत असलेला आणि माेजता येण्यासारखा आहे. दुसरी घरे, आता केवळ शनिवार-रविवारी जाऊन राहायची चैन राहिलेली नाहीत. ग्राहक आता या घरांमध्ये अनेक आठवडे, अगदी काही महिने राहतात आणि तिथूनच काम करतात. हायब्रिड कामाच्या पद्धतीमुळे, अशा घरांमध्ये राहणे ही केवळ चैनीची गाेष्ट न राहता एक गरजेची जीवनशैली बनली आहे,’ असे इस्प्रावा ग्रुपचे निभ्रांत शाह यांनी सांगितले. ‘हा विभाग आता अधिक प्रगल्भ झाला आहे.पूर्वी विखुरलेली असलेली ही बाजारपेठ आता अधिक सुव्यवस्थित हाेत आहे.तरुण खरेदीदार आणि मिलेनियल्स या बदलात माेठे याेगदान देत आहेत, त्यांना गुंतवणुकीचे तर महत्त्व आहेच बराेबरीने ‘वर्क-लाइफ’ बॅलन्सचीही गरज आहे.’
‘सेकंड हाेम्स’ची गरज वाढतेय : ‘वाढती मागणी जमिनीच्या व्यवहारांच्या वाढत्या संख्येवरून सहज लक्षात येते. एका सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 18 महिन्यांत डेव्हलपर्सनी 23 शहरांमध्ये 2,300 एकरपेक्षा जास्त जमीन संपादित केली आहे, ज्यापैकी 38% पेक्षा जास्त जमीन प्लाॅटेड किंवा निवासी प्रकल्पांसाठी राखीव आहे. ग्राहक, अशा ठिकाणी दुसऱ्या घरांचा शाेध घेत आहेत जिथे प्रदूषणाच्या काळात, विशेषतः नाेव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान दीर्घकाळ राहता येईल. या मालमत्तांकडे आता अधूनमधून राहण्याची पर्यटन स्थळे म्हणून नाही, तर गर्दीच्या शहरी वातावरणातून दिलासा देणारी घरे म्हणून पाहिले जात आहे,’ असे ‘द हाऊस’चे अभिनंदन लाेढा यांनी सांगितले. निसर्गाची सान्निध्यता आणि मुख्य शहरांशी असलेली कनेक्टिव्हिटी यावर ग्राहक केंद्रित आहेत.
प्राधान्याची ठिकाणे : ग्राहकांच्या आर्थिक क्षमतेनुसार गाेवा, अलिबाग आणि मुंबई जवळील खाेपाेली ही ठिकाणे चांगली उदाहरणे आहेत. लक्झरी मालमत्तांशी संबंधित सल्लागारांच्या मते, दुसऱ्या घरांची ही मागणी केवळ मनाेरंजनापेक्षा हवेची गुणवत्ता आणि उपयुक्ततेमुळे वाढत आहे. ‘हिवाळ्याच्या ऐन दिवसांत, महानगरांमध्ये हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक (एक्यूआय) पातळी नियमितपणे खराब ते गंभीर श्रेणीत जाताे, ज्यामुळे श्रीमंत ग्राहक अशा कमी घनतेच्या ठिकाणांचा शाेध घेतात जिथे एक्यूआय आणि वाहतूक सातत्याने चांगली असते. यामुळे प्लाॅटेड डेव्हलपमेंट आणि कनेक्टिव्हिटी असलेल्या शहराच्या जवळील भागातील व्हिलासाठी चाैकशीत सातत्यपूर्ण वाढ झाली आहे,’ असे मालमत्ता सल्लागार विक्रम कपूर यांनी सांगितल
‘सेकंड हाेम्स’कडे पाहताना : सेकंड हाेम्सना प्रतिसाद म्हणून, अनेक प्रस्थापित विकासक, जे त्यांच्या शहर-केंद्रित विकासासाठी ओळखले जातात, आता प्रीमियम प्लाॅट आणि छाेट्या क्लस्टर्समध्ये उतरत आहेत.वाढत चाललेली मागणी ते कमी घनतेचे फाॅरमॅट, गेट व प्लाॅट डेव्हलपमेंट आणि ‘मॅनेज्ड व्हिला कम्युनिटीज’च्या दिशेने वळवत आहेत, कारण खरेदीदार आता केवळ अल्पावधीतील दरवाढीपेक्षा खात्रीशीर देखभाल, नियमित विकास नियम आणि दीर्घकालीन राहण्यायाेग्यतेला महत्त्व देत आहेत. हा बदल वेग घेत असताना, दुसऱ्या घरांच्या बाजारपेठेत संघटित नियाेजन आणि सामाजिक सहभाग पाहायला मिळण्याची अपेक्षा आहे.सुधारित कनेक्टिव्हिटी, स्पष्ट नियाेजन आणि ग्राहकांमधील वाढती जागरूकता, या शाश्वत वाढीस मदत करतील.