सुधागड तालुका मराठा समाजातर्फे विद्यार्थ्यांना माेफत करिअर मार्गदर्शन

    25-Dec-2025
Total Views |
 

sudhagad 
 
सुधागड तालुका मराठा समाजातर्फे मराठा समाजाच्या स. स. साजेकर सभागृहामध्ये करिअर मार्गदर्शन शिबिर दि. 21 डिसेंबर 2025 राेजी आयाेजित केले हाेते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुधागड तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष धनंजय साजेकर यांनी भूषवले. या प्रसंगी कार्याध्यक्ष बळीराम निंबाळकर, सरचिटणीस सुचित बारस्कर, शिक्षण समिती प्रमुख भाेईर, विशाखा वेलणकर आदी मान्यवर, विद्यार्थी, पालक उपस्थित हाेते.पालक व विद्यार्थ्यांकडून चुकीचे मापदंड वापरून चुकीचे क्षेत्र निवड हाेऊन त्यांचे करिअरमध्ये सर्व प्रकारचे नुकसान टाळणे व सुयाेग्य मार्गदर्शन हाेऊनत्यांना करिअर निवडीसाठी मार्ग सुकर व्हावा, म्हणून सुधागड तालुक्यातील सर्व जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी या माेफत करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयाेजन केले हाेते, असे कार्याध्यक्ष बळीराम निंबाळकर यांनी आपल्या मनाेगतात नमूद केले. या शिबिरात लेखक, आरटीआय कार्यकर्ते, सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष व प्रसिद्ध करिअर मार्गदर्शक व्याख्याते विवेक वेलणकर यांनी मार्गदर्शन केले.मुख्य व्याख्यानानंतर उपस्थित विद्यार्थी व पालकांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे विवेक वेलणकर यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संताेष भाेईर यांनी, तर सूत्रसंचालन सतीश हूळे यांनी केले. जयवंत दंत यांनी आभार मानले.