जागरूक नागरिक हे देशाचे पहिले संरक्षण कवच : चाैहान

    25-Dec-2025
Total Views |
 
 

security 
 
‘नागरिक काेणत्याही देशाचे पहिले संरक्षण कवच असतात. जागरूक, सहभागी आणि उत्कट जनता देशाच्या संरक्षणात माेलाचे याेगदान देते. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेची जबाबदारी केवळ सशस्त्र दलांपुरती मर्यादित नसून, संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे,’ असे प्रतिपादन संरक्षणदल प्रमुख जनरल अनिल चाैहान यांनी केले.आशियातील सर्वांंत माेठ्या तंत्रज्ञान महाेत्सवांपैकी एक असलेल्या आयआयटी मुंबईच्या टेकफेस्ट-2025 मध्ये देशाच्या सामरिक संरक्षण दृष्टिकाेनावर, तंत्रज्ञानाच्या भूमिकेवर आणि भविष्यातील युद्धांच्या बदलत्या स्वरूपावर जनरल चाैहान यांनी भारताची सामरिक संरक्षण दृष्टी, तंत्रज्ञान, एकात्मता आणि भविष्यातील युद्धे या विषयावर भूमिका मांडली. देशातील सर्वांत तेजस्वी आणि तरुण बुद्धिमत्तेशी संवाद साधण्याचा हा क्षण अभिमानास्पदआहे.
 
विकसित भारत साकार करण्याची क्षमता तरुणाईत असून, ती ताकद याेग्य दिशेने वापरली गेली तर भारत जागतिक नेतृत्वाच्या दिशेने वेगाने पुढे जाईल.त्यामुळे विकसित भारत या संकल्पनेत तरुण पिढीची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.आजचे युद्ध केवळ देशांच्या सशस्त्रदलांपुरते मर्यादित राहिलेले नाही.भाडाेत्री सैनिक, खासगी सुरक्षा संस्था, सायबर क्षेत्रातील नेटकरी; तसेच समाज माध्यम युद्धाचा भाग बनले आहेत.इंटरनेटवरील माहितीच्या आधारे स्फाेटके, रासायनिक किंवा जैविक शस्त्रे तयार करण्याचा धाेका वाढला आहे, याकडे जनरल चाैहान यांनी लक्ष वेधले.युद्धभूमी आता केवळ जमिनीपुरतमर्यादित राहिलेली नाही. जमिनीपासून समुद्र, आकाश, सायबर, अंतराळ, विद्युतचुंबकीय आणि संज्ञात्मक क्षेत्रांपर्यंत युद्धक्षेत्रांचा विस्तार झाला आहे.
 
ही क्षेत्रे आता सर्वसामान्य जीवनाचा अविभाज्य भाग बनल्याने ती अधिक संवेदनशील आणि महत्त्वाची ठरली आहेत. तंत्रज्ञानामुळे युद्धात क्रांतिकारक बदल घडत असून, कृत्रिम बुद्धिमत्ता, राेबाेटिक्स, हायपरसाॅनिक शस्त्रे, प्रगत सेन्सर्स आणि डेटा विश्लेषणामुळे युद्ध अधिक वेगवान बनत आहे. मानव विरुद्ध मानव याऐवजी मशीन विरुद्ध मशीन अशी युद्धाची दिशा बनत असल्याचेही त्यांनी नमूद केले.भविष्यातील संरक्षण धाेरण मांडताना जनरल चाैहान यांनी ‘जय’च्या माध्यमातून संयु्नतता, आत्मनिर्भरता आणि नवाेन्मेष ही संकल्पना मांडली. संयु्नतता म्हणजे तिन्ही सशस्त्र दलांनी एकत्र याेजना आखणे आणि एकत्र लढणे. आत्मनिर्भरता म्हणजे केवळ संरक्षण साहित्य निर्मिती नव्हे, तर भारतीय परिस्थितीनुसार धाेरणात्मक विचारसरणी विकसित करणे.नवाेन्मेषामुळेच युद्धात आश्यर्याचा घटक टिकून राहताे, असे त्यांनी स्पष्ट केले.