बिबट्याच्या हल्ल्यातील जखमींना नुकसान भरपाई देणार : वनमंत्री गणेश नाईक
25-Dec-2025
Total Views |
भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना राज्य शासनाकडून भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.याबाबतची घाेषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी केली आहे.भाईंदरमध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला. यात इमारतीत घुसून बिबट्याने सात जणांना जखमी केले. अखेर सात तासांच्या प्रयत्नांनंतर वन विभागाने बिबट्याला ताब्यात घेतले. भाईंदरसारख्या शहरी भागातही बिबट्याने शिरकाव केल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. बिबट्याने हल्ला केलेल्या पारिजात इमारतीला गणेश नाईक यांनी भेट देत पीडित कुटुंबांशी संवाद साधला. तसेच बिबट्या येण्यामागची कारणे वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. याशिवाय पीडितांना वन विभागाकडून भरपाईसह इतर शासकीय सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती नाईक यांनी दिली.