ओट्सबाथने बाळ स्किन प्राॅब्लेमपासून सुरक्षित राहील

    25-Dec-2025
Total Views |
 

child 
 
नवजात बाळाची स्किन अत्यंत नाजुक आणि साॅफ्ट असते. त्यामुळे ती जपणे अत्यावश्यक असते. स्किन प्राॅब्लेमपासून मु्नती देण्यासाठी बाळाला ओट्स स्नान फायदेशीर असते. पाण्यात हे पीठ मिसळून स्नान घालणे म्हणजे ओट्स बाथ. ओट्समध्ये खाज व सूज कमी करण्याचे घटक असतात. तसेच ते स्किन माॅइश्चराइजही करते.मार्केटमध्ये मिळणाऱ्या लाेशन आणि साबणात कित्येक प्रकारची केमिकल्स असतात. ज्यामुळे बाळाच्या स्किनवर रॅशेस आणि अ‍ॅलर्जी हाेऊ शकते. स्किन इंफे्नशनमुळे जर बाळाच्या इन्फे्नटेड भागात सूज असेल तर त्याला अशाप्रकारे आंघाेळ घातल्यास आराम मिळेल.हे तयार करण्यासाठी सर्वप्रथम ओट्स पावडर घ्या.
 
हे लक्षात ठेवा की, ओट्स बाथसाठी ऑर्गेनिक, इंस्टंट व अनफ्लेवर्ड ओट्सचाच वापर करावा.टबमध्ये काेमट पाणी घ्या. यामध्ये ओट्स पावडर टाका आणि मिसळून विरघळू द्या. जेव्हा पाणी दुधाळ व चमकदार दिसेल तेव्हास्नानासाठी पाणी तयार झाले आहे असे समजा.बाळाला ओट्सच्या पाण्याने स्नान घालण्यापूर्वी याची काेरडी पावडर म्हणजेच पीठ स्किनवर लावून 15-20 मिनिटांसाठी ठेवा. बाळाला यामुळे काेणत्याही प्रकारचे रॅशेस वा खाज येत नाही ना ते पहा. जर बाळ व्यवस्थित असेल तर ओटमील मिसळलेल्या पाण्यात 10 मिनिटे बाळाला बसवा. यानंतर स्वच्छ पाण्याने स्नान घालून मुलायम टाॅवेलने त्याचे शरीर पुसा. बाळाच्या शरीराला रॅशेसपासून हळूहळू आराम वाटेल.