थंडीत घर आरामदायक ठेवण्यासाठी स्मार्ट आयडिया

    21-Dec-2025
Total Views |
 

home 
 
हिवाळ्यात घराचे इंटीरियर थाेडेसे बदलल्यास हेही थंड वाऱ्यासाठी तयार हाेईल. हे बदल आपल्याला थंडीपासून वाचवतीलच, शिवाय घराला विंटर लुकही देतील. यासाठी जास्त पैसा खर्च करण्याचीही गरज नाही. काही साेप्या पद्धती अवलंबून आपण घराला नवा व ट्रेंडी लुक देऊ शकता.विंटर लुकमध्ये थीम सेट करण्यासाठी कलर पॅलेट महत्त्वाचा राेल बजावते. अशावेळी जाड व हेवी फॅब्रिकचे व्हेलवेटचे डार्क कलरच्या पडद्यांनी घर डेकाेरेट करून वार्म लुक द्यावा. यासाठी आपण डीप रेड, ऑरेंज, गाेल्ड व ब्राउनसारखे रंग वापरू शकता.काही हटके करावेसे वाटत असल्यास आपले घर कँडल्सने सजवा. खाण्याचे टेबल असाे वा बैठकीतील सेंटर टेबल, ते वेगवेगळ्या सुगंधित मेणबत्त्यांनी सजवा.
 
घरात पडलेल्या जुन्या स्वेटरचा वापर करून अनेक प्रकारचे क्राफ्ट बनवू शकता. यापासून साेफा व डायनिंग चेअरसाठी कुशन, त्नके, फूट मॅट, डेकाेरेशन पीस बनवू शकता.विंटरमध्ये फरशी गार पडते. अशावेळी लिव्हिंग रूम आणि रूमच्या फ्लाेरवर अंथरलेले कार्पेट मखमली आणि व्हेलवेट स्टफने डेकाेरेट करा. छाेटे छाेटे डाेअरमॅट्स एकत्र जाेडूनही कार्पेट तयार करू शकता.साेफा आणि बेडवर स्टायलिश आणि वेगवेगळ्या रंगांचे कुशन ठेवू शकता.घराचे वातावरण उबदार ठेवू इच्छित असाल, तर स्टायलिश इनडाेअर प्लांट लावावेत.बाथरूमलाही थाेडा वेगळा टच द्या. कलरफूल बाथ टाॅवेल्सने हे काम हाेईल.