अंकुरित आहाराने त्वचा निराेगी राहील

    21-Dec-2025
Total Views |
 

Health 
आजच्या धावपळीच्या जीवनात संतुलित आहार सेवनाची काेणी कल्पनाही करू शकत नाही. अशावेळी प्रत्येकाला व्हिटॅमिन गाेळीसारख्या एका आहाराची गरज असते. जाे ताे कमी वेळेत झटपट मिळवून आपल्या आराेग्याची गॅरंटी घेईल.अशाच एका चमत्कारी आहाराचे नाव आहे अंकुरित आहार.अंकुरित आहार जीवनाचा आधारभूत स्राेत आहे आणि हजाराे वर्षांपासून पाेषणाचे एक माेठे माध्यम मानले जात आहे. यात आढळणाऱ्या गुणांच्या आधारे यालाअमृताहारही म्हणतात. निसर्गाेपचारात अंकुरित आहाराला जिवंत आहार मानतात.निसर्गात क्षारीय असल्यामुळे अंकुरित आहार आराेग्यसुधारणा, शरीराच्या पुष्टिकरणात सहायक आणि राेगप्रतिराेधक बनताे.निसर्गाेपचाराच्या मते आराेग्य संरक्षणासाठी आपल्या आहाराचा वीस टक्के भाग आम्लीय आणि एेंशी टक्के भाग क्षारीय असायला हवा. जाहीर आहे की, यासाठी आपल्या आहारात मुख्यत्वे माेठ्या प्रमाणात कच्चा आहार व अंकुरित आहार इ.चा समावेश व्हावा.
 
अंकुरित आहाराचे फायदे मूग, हरभरा, गहू, साेयाबीन, चवळी आणि मेथ्यादाण्यांचा वापर आपण अंकुरणासाठी म्हणजेच माेड आणण्यासाठी करू शकता. अंकुरणानंतर काही दाण्यांमध्ये व्हिटॅमिन सी, लाेह, रिबाेफ्लाेविन, नियासिन आणि फास्फाेरसचे प्रमाण वाढते तर अपाेषक घटक म्हणजेच ओलीगाेसॅकराइड्स इ.चे प्रमाण कमी हाेते.या खाद्यतत्त्वांमध्ये आढळणारा स्टार्च, ग्लुकाेज, फ्र्नटाेज आणि माल्टाेज बदलताे.हे फक्त अंकुरित आहाराचा स्वादच वाढवत नाही तर याची पाचकताही वाढतवत.बदलाची ही प्रक्रिया डाळींमध्ये संथपणे व धान्यांमध्ये वेगाने हाेते. अंकुरित आहर आपले शरीर सहजतेने आत्मसात करते व आम्हाला त्वरित ऊर्जा देते.अंकुरित आहार कच्चाच घ्यायला हवा.शिजवून खाल्ल्यास त्याचे पाैष्टिक घटक कमी हाेतात. काही आहार विशेषज्ञ हे वाफेवर शिजवण्याचाही सल्ला देतात जेणेकरून हे अधिक सुपाच्य हाेईल. वृद्ध व्यक्तींद्वारे अंकुरित आहार चावण्यास त्रास झाल्यामुहे हे म्निसीत वाटून पेस्ट बनवून वापरण्याचा सल्लाही दिला जाताे.