र्नित पदांच्या भरतीसाठी बाेर्डाचे कर्मचारी संपावर गेले

    21-Dec-2025
Total Views |
 

board 
 
 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयांमधील र्नित पदे तातडीने भरण्यात यावीत, तसेच प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्यात यावी. या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र बाेर्ड कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदाेलन सुरू केले आहे. नाशिक येथील मंडळ कार्यालयासह राज्यातील सर्व विभागीय मंडळ कार्यालयांमध्ये बुधवारपासून (दि.17) हे आंदाेलन सुरू झाले आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत कार्यरत नऊ विभागीय मंडळ कार्यालयांमध्ये मंजूर असलेल्या तृतीय श्रेणी कनिष्ठ लिपिकांच्या एकूण 591 पदांपैकी सुमारे 350 ते 370 पदे सध्या र्नित आहेत. या माेठ्या प्रमाणातील र्नित पदांमुळे कार्यरत असलेल्या माेज्नया कर्मचाऱ्यांवर अतिर्नित कामाचा ताण वाढला असून, त्याचा थेट परिणाम कार्यालयीन कामकाजाच्या गतीवर हाेत आहे.
 
अनेक लिपिकांना आपल्या नियमित कामासाेबतच अतिर्नित जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंताेष निर्माण झाला आहे.महासंघटनेने वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून ठाेस निर्णय न झाल्याने अखेर बेमुदत आंदाेलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे आंदाेलनकर्त्यांनी सांगितले.या आंदाेलनामुळे फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये हाेणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तयारी व संबंधित प्रशासकीय कामकाजावर विपरित परिणाम हाेण्याची श्नयता वर्तवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शासन व मंडळ प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदाेलन तीव्र केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी महासंघटनेचे सरचिटणीस शालिग्राम चव्हाण, उपाध्यक्ष संजय बाेरसे, सचिव दिनेश मुसळे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित हाेते.