चैत्यभूमीवर डाॅ. आंबेडकरांच्या स्मृतीस राजदूत विशाल शर्मा यांचे अभिवादन

    21-Dec-2025
Total Views |
 
 
 

baba 
पॅरिसमधील युनेस्काे मुख्यालयात भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या घटनेला विशेष ऐतिहासिक महत्त्व आहे.जगभरातील नागरिकांना डाॅ. आंबेडकर यांच्या शिक्षण, मानवाधिकार आणि सामाजिक समतेच्या मूल्यांची ओळख करून देणे, हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे युनेस्काेतील भारताचे राजदूत व स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा यांनी सांगितले. शर्मा यांनी दादरच्या चैत्यभूमीला भेट देऊन डाॅ. आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले. त्यावेळी ते बाेलत हाेते. डाॅ. बाबासाहेब माझ्यासाठी बालपणापासून आदर्श आहेत. शिक्षणाच्या जाेरावर यश मिळवण्याचा मार्ग बाबासाहेबांनी दाखवला असून, जात, धर्म, पंथ यापलीकडे जाऊन शिक्षण घेण्याची प्रेरणा त्यांनी समाजाला दिली.बाबासाहेबांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी युवकांना केले.