कृषी संलग्नित उद्याेग, काैशल्य आधारित उद्याेग, खनन, पर्यावरण व पर्यटन अशा क्षेत्रांच्या आधारे जिल्ह्यांची आर्थिक प्रगती व पर्यायाने नागपूर विभागाचा विकास साधण्यासाठी सर्व विभागांनी वेळाेवेळी भागधारकांच्या बैठका घेऊन नियाेजनबद्ध पद्धतीने कार्य करण्याच्या सूचना विभागीय आयु्नत विजयलक्ष्मी बिदरी यांनी विविध विभागप्रमुखांना दिल्या.जिल्हास्तरीय विकासाला चालना देण्यासाठी संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्पांतर्गत (महास्ट्राईड) बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर विभागातील जिल्ह्यांसाठी विभागीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची प्राथमिक बैठक विभागीय आयु्नत कार्यालयात झाली, त्यावेळी बिदरी बाेलत हाेत्या.
महसूल अपर आयु्नत राजेश खवले, राेहयाे सहआयु्नत अविनाश हदगल, पुरवठा उपायु्नत अनिल बनसाेड, कृषी सहसंचालक उमेश घाटगे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख; तसेच ‘मित्रा’ संस्थेचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित हाेते.नागपूर विभागातील जिल्ह्यांत असलेले उद्याेग, कृषी, पर्यटन, खनन आदी क्षेत्रांचा परिपूर्ण अभ्यास करून महास्ट्राईड अंतर्गत सुयाेग्यनियाेजनाच्या सूचना बिदरी यांनी दिल्या. दर महिन्याला या संदर्भात भागधारकांच्या बैठका घ्याव्यात व येणाऱ्या अडचणींबाबत समाधान शाेधून उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न व्हावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.