माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र या कार्यक्रमात हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागमानिमित्त हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहादूर साहिबजी 350 व्या शहिदी समागम समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक यांची विशेष मुलाखत प्रसारित हाेणार आहे. ही मुलाखत मंगळवारी (2 डिसेंबर) रात्री 8 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पाहता येणार आहे.तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाज माध्यमांवरही पाहता येईल. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे. हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या शहिदीला 350 वर्षे पूर्ण हाेत आहेत.या निमित्ताने नागपूर, नवी मुंबई आणि नांदेडला अल्पसंख्याक विकास व औकाफ विभाग, महाराष्ट्र शासन आणि श्री गुरू तेग बहादूर साहिबजी 350 वी शहिदी समागम राज्यस्तरीय समितीच्या विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमांचे स्वरूप, अंमलबजावणी व राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी नाईक यांनी या कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.