आरे-कफ परेड मार्गिकेवर मासिक पास सुविधा; प्रवाशांना दिलासा

    02-Dec-2025
Total Views |
 

metro 
 
आरे-कफ परेड भुयारी मेट्राे-3 मार्गिकेवर मासिक पासची सुविधा उपलब्ध करण्याची मागणी प्रवाशांकडून हाेत हाेती.ही मागणी मान्य करून अखेर मुंबई मेट्राे रेल काॅर्पाेरेशनने (एमएमआरसी) नुकतीच मासिक पास सुविधा उपलब्ध केली आहे.एमएमआरसीने ही सुविधा सुरू करताना या पासवर 10 ते 15 ट्न्नयांची सवलत देत प्रवाशांना माेठा दिलासा दिला.एमएमआरसीने 33.5 कि.मी.च्या मेट्राे-3 मार्गिकेचे काम तीन टप्प्यांत पूर्ण करून टप्प्याटप्प्याने ही मार्गिका सेवेत दाखल केली आहे. आरे-कफ परेड मेट्राे सेवा 9 ऑक्टाेबरपासून पूर्ण क्षमतेने धावू लागली. शेवटचा टप्पा सुरू झाल्याने उपनगरांतून दक्षिण मुंबईत काही मिनिटांत पाेहाेचणे साेपे झाले आहे.त्यातही सीएसएमटी, चर्चगेट, मंत्रालयात जाणे साेपे झाल्याने या मार्गिकेला आता प्रवाशांचा प्रतिसाद मिळू लागला आहे.
 
या मार्गिकेवरून दिवसाला दीड लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करीत आहेत.दरम्यान, ही मार्गिका पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर प्रवाशांनी मासिक पासची सुविधा उपलब्ध करण्याची मागणी केली हाेती. ही मागणी लक्षात घेत एमएमआरसीने मासिक पासची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार तिकीट प्रणालीत आवश्यक ते बदल करण्यात आले. प्रणालीची चाचणी पूर्ण करून अखेर ही सुविधा सुरू करण्यात आली.या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांनी माेबाइल अ‍ॅपचा वापर करावा. अशी सुविधा उपलब्ध करून देणारी मेट्राे-3 ही देशातील पहिली मेट्राे ठरली आहे.काही दिवसांनी मासिक पासची सुविधा नॅशनल काॅमन माेबिलिटी कार्डवरही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे एमएमआरसीकडून सांगण्यात आले.