चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्याचे काही उपाय

    02-Dec-2025
Total Views |
 

Health 
 
चेहऱ्यावर कमी वयात सुरकुत्या येणं काेणालाच आवडत नाही. प्रत्येक महिलेला आपला चेहरा कायम तरूण आणि सुंदर दिसावा असंच वाटत असतं.मात्र त्यासाठी चेहऱ्याची निगा राखणं अत्यंत गरजेचे आहे. कारण चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या तर चेहरा अधिक म्हातारा दिसू लागताे आणि तरूणवयातच म्हातारपणाचा लुक येताे. चेहऱ्यावरील सुरकुत्या घालविण्यासाठी नारळाच्या तेलाचा प्रयाेग करता येऊ शकताे.नारळाच्या तेलाचा वापर करताना नेहमी लक्षात ठेवा की, नारळाच्या तेलामध्ये त्वचेला नुकसान करणाऱ्या फ्री रॅडिकल्सशी दाेन हात करण्याची क्षमता असते. त्वचेवरील सुरकुत्या काढून टाकण्यासाठी त्यामुळे हे फायदेशीर ठरते. राेज रात्री झाेपताना तुम्ही हे चेहऱ्याला लावावे.
 
चेहऱ्यावरील सुरकुत्या काढण्यासाठी तुम्ही नारळाच्या तेलाचा वापर अत्यंत साेप्या पद्धतीने करू शकता. तुम्ही विविध पद्धतीने नारळाचे तेल चेहऱ्याला लाऊ शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नारळाचे तेल काहीही मिक्स न करता लावल्याने चेहऱ्यावर अधिक चमक राहाते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाहीत.सुरकुत्या काढण्यासाठी तुम्ही नारळाचे तेल डायरेक्ट वापरू शकता. याशिवाय नारळाच्या तेलात थाेडेसे कॅस्टर ऑईल मिक्स करा. या तेलामध्ये अँटीइन्फ्लेमेटरी, अँटीरिंकल्स गुण असतात. जे सुरकुत्या काढून टाकण्यासाठी मदत करतात.हे चेहऱ्यावरील वाढत्या वयाची लक्षणे मिटवतात. 1 चमचा नारळाच्या तेलात थाेडेसे कॅस्टर ऑईल मिक्स करा.त्यानंतर आपल्या चेहऱ्यावर सर्क्युलेशन माेशनप्रमाणे लावा आणि रात्रभर तसंच राहू द्या. सकाळी पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. त्वचेला माॅईस्चर मिळून त्वचेवरील सुरकुत्यांपासून सुटका मिळते.