प्राधिकरणाने विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत: विभागीय आयु्नतांची सूचना

    02-Dec-2025
Total Views |
 
 

gg 
छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विविध प्रकल्प आणि याेजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा विभागीय आयु्नत तथा महानगर आयु्नत जितेंद्र पापळकर यांनी घेतला. प्राधिकरण क्षेत्रातील कामकाज अधिक गतिमान व पारदर्शक हाेण्यासाठी विविध संस्थांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला.विभागीय आयु्नत कार्यालयात झालेल्या बैठकीस महानगर नियाेजनकार हर्षल बाविस्कर, सहनियाेजनकार रवींद्र जायभाये, नगररचना तज्ज्ञ सुनील सुकळीकर यांच्यासह प्राधिकरण क्षेत्रात कार्यरत वास्तुविशारद, अभियंता, सर्वेअरसंघटना, मसिआ, क्रेडाई, आयआयएसह संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
 
प्राधिकरणाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विकासकामांबाबत सूचनांची देवाणघेवाण; तसेच आवश्यक सुधारणेसंदर्भातही चर्चा झाली.प्राधिकरण क्षेत्रात हस्तांतरणीय विकास ह्नक (टीडीआर) लागू करण्यास प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीने 17 ऑक्टाेबरच्या बैठकीत मंजुरी दिली आहे.डीपी रस्ते व आरक्षणामुळे बाधित जमिनीचे हस्तांतर करणाऱ्या जमीनमालकांना प्राधिकरणामार्फत टीडीआर जारी करण्यात ेणार असून, त्यामुळे विकासकामांना आवश्यक गती मिळण्यास मदत हाेणार आहे. प्राधिकरणाच्या कामकाजात गती, पारदर्शकता आणि नियाेजनशिस्त राखत विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्याच्या सूचना विभागीय आयु्नतांनी दिल्या.